छत्रपती संभाजीनगर : अर्धा पावसाळा संपलाय; मात्र, मराठवाड्यातील मोठ्या धरणांत केवळ १६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने चिंतेची परिस्थिती आहे. बहुतेक मोठ्या आणि मध्यम धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे किंवा ही धरणे कोरडी आहेत. मोठ्या प्रकल्पांत गतवर्षी आजच्या तारखेला ३५.१७ टक्के पाणीसाठा होता.
मराठवाड्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता. मात्र, येथील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत २०२२ सालातील पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे विशेष पाणीसंचय न झाल्याने मराठवाड्यातील सुमारे ९० मध्यम प्रकल्प आणि ७५० लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. मराठवाड्यात गतवर्षी अत्यल्प पाऊस पडला होता. मात्र, येथील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत २०२२ सालातील पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे विशेष पाणीसंचय न झाल्याने मराठवाड्यातील सुमारे ९० मध्यम प्रकल्प आणि ७५० लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत.तीन प्रकल्प कोरडे
मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागाकडेही मुसळधार पावसाने पाठ फिरवल्याने जायकवाडी प्रकल्पात आजच्या दिवशी केवळ ४.३ टक्के जिवंत जलसाठा उरला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी आजच्या दिवशी प्रकल्पात २७.६५ टक्के पाणीसाठा होता. सीना कोळेगाव, मांजरा आणि माजलगाव या तीन मोठ्या प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पावर जवळची शहरे आणि गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. तेथे धरणांतील मृत साठ्यातून पाणीपुरवठा होत आहे.
धरण आजचा जलसाठा आणि गतवर्षीची स्थितीजायकवाडी - ४.३ टक्के ---- २७.६५ टक्केनिम्न दुधना - ६.४० टक्के ------- २७.३८ टक्केयेलदरी - ३०.८ टक्के ------ ५७.८८ टक्केसिद्धेश्वर - ५.६६ टक्के ------ ९.८७ टक्केपेनगंगा - ४० टक्के --------- ४८.८० टक्केमानार - २७.३६ टक्के -------- ३५.६ टक्केनिम्न तेरणा - २५ टक्के ------- २७.६० टक्केविष्णुपुरी - ७० टक्के ----- ५३.६१ टक्केमाजलगाव - ०० ------ १६.२८ टक्केमांजरा -- ०० ----- २३.२४ टक्केसीना कोळेगाव - ०० ---- उणे १४ टक्केमराठवाड्यात आजवर ५२ टक्के पाऊस
पाणलोट क्षेत्राला दमदार पावसाची अपेक्षामराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५२.२ टक्के पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी ६७९.५ मिमी पाऊस पडतो. त्याच्या तुलनेत आजवर ३५४.७ मिमी पाऊस विभागात झाला आहे. परंतु, प्रत्यक्षात पाणलोट क्षेत्रामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे ७४९ लहान, ११ मोठे व मध्यम अशा ७५ प्रकल्पांमध्ये १६.२४ टक्के जलसाठा आहे. विभागात ५२.२ टक्के पाऊस सध्या झाल्याचे आकडे सांगत आहेत; परंतु, वस्तुस्थिती पाहिली तर हा पाऊस पेरण्यांसाठी पूरक आणि धरण क्षेत्रासाठी अपुरा आहे. गोदावरी नदीसह ११ नद्यांचे पाणलोट क्षेत्र कमी पावसामुळे तहानले आहे. दमदार पाऊस पाणलोट क्षेत्रात न झाल्यामुळे प्रकल्पांना कमी पाणी आहे.
जिल्हानिहाय पाऊसछत्रपती संभाजीनगर - ५६.९ टक्केजालना - ५५.३ टक्केबीड - ६२.३ टक्केलातूर - ५६.४ टक्केधाराशिव - ६१.१ टक्केनांदेड - ४४.४ टक्केपरभणी - ४५.८ टक्केहिंगोली - ४३.४ टक्केएकूण : ५२.२ टक्के
- वार्षिक सरासरी पाऊस : ६७९.५ मिमी- जूनपासून आजवरचा पाऊस : ३५४.७ मिमी- जुलै महिन्यात पडलेला पाऊस १७१.४ मिमी- पेरण्या : ९७ टक्के
पाणलोट क्षेत्रात आजवर झालेला पाऊसप्रकल्प ................. नदी क्षेत्रातील पाऊसजायकवाडी गोदावरी .... २१८ मिमीनिम्न दुधना ........ ४२३ मिमीयेलदरी पूर्णा......... ४९३ मिमीसिद्धेश्वर पूर्णा .......... ३१७ मिमीमाजलगाव सिंदफणा .... २६५ मिमीमांजरा ........... ४७४ मिमीपेनगंगा .......... ३७९ मिमीमानार ............ ४४६ मिमीनिम्न तेरणा ............ ४२३ मिमीविष्णुपुरी गोदावरी ........ ३८६ मिमीसीना कोळेगाव ....... २७४ मिमी