औरंगाबाद - जालना, हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांत रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले.जालना जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी पहाटे मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. काही मिनिटे शहरासह जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस झाला. नऊनंतर पुन्हा ऊन पडले. शेतात सध्या गहू, ज्वारी काढणी सुरू आहे. शेतकºयांनी ताडपत्रीने गहू, ज्वारी झाकली. वसमत (जि. हिंगोली) शहर व तालुक्यातही सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल अर्धातास झालेल्या पावसाने गहू, ज्वारी, हरभºयाला तडाखा दिला.निलंगा (जि. लातूर) तालुक्यातील केळगाव, मसलगा परिसरात सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. हरभरा, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले़ केळगाव येथे वादळी वाºयासह हलका पाऊस झाला.नांदेड शहरासह जिल्ह्यातवीज पडून बैल ठारशनिवारी मध्यरात्री औराद येथेही रिमझिम पाऊस झाला़ परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड तालुक्यात वादळी वाºयासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. लोहा तालुक्यातील पिंपळगाव येवला येथे वीज पडून बैल ठार झाला़प्रमुख शहरांमधील कमाल तापमानपुणे ३७़१, जळगाव ३७, कोल्हापूर ३६, महाबळेश्वर ३१़३, मालेगाव ३७़४, नाशिक ३६़३, सातारा ३७, सोलापूर ३८़३, मुंबई ३४़८, सांताक्रुझ ३७़८, अलिबाग ३४़६, रत्नागिरी ३४़७, पणजी ३३, डहाणू ३३़६, भिरा ४२, औरंगाबाद ३४़६, परभणी ३६़९, नांदेड ३८, अकोला ३१, अमरावती ३०़८, बुलढाणा ३५़२
अर्ध्या मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 4:51 AM