शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
2
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
3
अजित पवार गटाच्या बंडखोरीविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म
4
एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे
5
"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम एक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्मूला
6
Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करा, नाहीतर नरकात जावे लागेल; वाचा महत्त्व!
7
"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
8
दिवसभर नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा रात्री उशिरा घरी परतले, पण...
9
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
10
धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री
11
IND vs NZ: मुंबईत गेली १२ वर्ष भारत अजिंक्य! शेवटचा विजय न्यूझीलंडविरूद्धच... पाहा आकडेवारी
12
अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!
13
Stock Market: मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात, Sensex ३०० अंकांनी आपटला
14
"हा निर्णय कठीण होता, पण...", सई ताम्हणकरने अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याची दिली कबुली
15
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
16
मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर, या फॉर्म्युलानं सुरू करा गुंतवणूक; १८ व्या वर्षी मूल बनेल कोट्यधीश
17
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
18
वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत
19
शुक्रवारी लक्ष्मीपूजन: ८ राशींना अनुकूल, धनलाभाचे योग; धनलक्ष्मी प्रसन्न होईल, वरदान काळ!
20
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग

अर्धावेळ संपला, ४ तासांत ३० टक्के मतदान;मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उमेदवारांची धावपळ

By विकास राऊत | Published: January 30, 2023 1:14 PM

राजकीय पक्ष, संघटनांसह अपक्षांमुळे बहुरंगी निवडणूक होत आहे.

औरंगाबाद: मराठवाडाशिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आज तब्बल २२६ केंद्रांवर मतदान सुरु आहे. सकाळपासून मतदानास संथ सुरुवात झाली. चार तासात केवळ ३० टक्के मतदान झाल्याने उमेदवारांची मतदारांना केंद्रांपर्यंत आणण्यासाठी धावपळ सुरु आहे. 

राजकीय पक्ष, संघटनांसह अपक्षांमुळे बहुरंगी निवडणूक होत आहे. एकूण १४ उमेदवार असून ६१ हजार मतदार आहेत. मराठवाडाशिक्षक मतदारसंघाची निवडणुक भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आ.विक्रम काळे यांच्या विरोधात भाजपचे किरण पाटील आहेत. आ.काळे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आ.काळे विरूध्द पाटील असे चित्र दिसत असताना मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी देखील जोर लावला आहे. तसेच राष्ट्रवादी आणि भाजपा दोन्ही पक्षातील बंडखोर किती मतदारांना आकर्षित करतात यावर अधिकृत उमेदवारांचे लक्ष आहे. 

दरम्यान, आज सकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी लातूर येथे, भाजपचे उमेदवार किरण पाटील यांनी औरंगाबाद तर मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी कंधार तालुक्यातील प्रियदर्शिनी हायस्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले आहे. हीच गती राहिली तर ५० ते ६० टक्क्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. २ फेब्रुवारीला चिकलठाणा एमआयडीसीमध्ये मतमोजणी होणार आहे. 

बहुरंगी लढत; १४ उमेदवार रिंगणातराष्ट्रवादीकडून आ. विक्रम काळे, भाजपकडून प्रा. किरण पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून कालिदास माने, तर मराठवाडा शिक्षक संघाकडून सूर्यकांत विश्वासराव, अपक्ष म्हणून प्रदीप साेळुंके, मनोज पाटील, संजय तायडे, कादरी शाहेद अब्दुल गफूर, अनिकेत वाघचवरे, नितीन कुलकर्णी, विशाल नांदरकर, प्रा. अश्विनकुमार क्षीरसागर, आशिष देशमुख, ज्ञानोबा डुकरे मैदानात आहेत.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय मतदार असे......जिल्हा - पुरुष मतदार - महिला मतदार – एकूण मतदारऔरंगाबाद - ८७०५            - ५२१९ - १३९२४जालना - ४१८६            - ८५१ - ५०३७परभणी - ३७९८            - ६७४ - ४४७२हिंगोली - २५८०             - ४८० - ३०६०नांदेड - ७००८             - १८१३ - ८८२१बीड - ७७५०            - २०१९ - ९७६९लातूर - ८५२७            - २७३७ - ११२६४उस्मानाबाद - ४२२६             - ९५६ - ५१८२एकूण - ४६७८० - १४७४९ - ६१५२९

टॅग्स :ElectionनिवडणूकMarathwadaमराठवाडाTeacherशिक्षकAurangabadऔरंगाबाद