वाळूज महानगर : जोगेश्वरी येथील डब्ल्युटीपी सेंटरच्या (वॉटर ट्रीटमेंट प्लांट) भूखंडावर झालेले अतिक्रमण गुरुवारी (दि. २२) ग्रामपंचायतीने जमीनदोस्त केले.
जोगेश्वरी ग्रामपंचायतीने येथील शासकीय जागेवर मलनिस्सारण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रकल्पात ड्रेनेजलाइनच्या घाण पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. सदर भूखंडावर दोन-तीन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने चोहोबाजूने पत्रे लावून अतिक्रमण केले. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सरपंच व सदस्यांनी एकत्र येत तात्काळ अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. यावेळी सरपंच गजानन बोंबले, उपसरपंच प्रवीण दुबिले, ग्रामविकास अधिकारी बी. एल. भालेराव, सामाजिक कार्यकर्ते अमोल लोहकरे, माजी सरपंच सोनू लोहकरे, ग्रामपंचायत सदस्या मीना पनाड, भारती साबळे, नजीरखाँ पठाण, हिरा सौदागर, रुख्मिणी काजळे, प्रभाकर काजळे, संगीता ठोकळ, शाईनबी शेख, योगेश दळवी, योगिता आरगडे, प्रवीण थोरात, शीला वाघमारे, शांताबाई बिलवाल, अनिल वाघ, मोईस शेख, पंडित पनाड आदींनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.
अतिक्रमणावर पडला हातोडा
वॉटर ट्रीटमेंट प्लांटसाठी आरक्षित भूखंडावर चोहोबाजूने लावलेले लोखंडी पत्रे व लाकडी बल्ल्या जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आल्या. अतिक्रमणाचे साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा सरपंच गजानन बोंबले, उपसरपंच प्रवीण दुबिले, ग्रामविकास अधिकारी बी. एल. भालेराव व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
फोटो ओळ- जोगेश्वरीत डब्ल्युटीपी सेंटरच्या भूखंडावर झालेले अतिक्रमण हटविले तेव्हा ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
फोटो क्रमांक- अतिक्रमण १/२/३
------------------------