वाळूज महानगर: सिडको वाळूजमहानगर परिसरातील सारा सार्थक या सोसायटीतील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे नागरिकांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. संतप्त महिलांसह नागरिकांनी शुक्रवारी हंडामोर्चा काढत सिडकोच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणुन सोडला.
या सोसायटीत जवळपास २५० कुटुंब वास्तव्यास असून, गत चार ते पाच महिन्यांपासून सोसायटीतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे या सोसायटीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील पाणी पुरवठा सुरळीत करावा, यासाठी नागरिकांना सिडकोकडे लेखी स्वरुपात तक्रारी केल्या आहेत.
मात्र, याकडे सिडको प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांना उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पूर्वी या भागात आठवड्यातून दोनदा पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, काही दिवसांपासून एमआयडीसीकडून पाणी पुरवठ्यात कपात झाल्याचे कारण दर्शवून सिडकोकडून आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे.सारा सार्थक सोसायटीतील रहिवाशांनी शुक्रवारी सकाळी हंडामोर्चा काढत सिडकोच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर नागरिकांनी माजी जि.प.सदस्य अनिल चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पाणी पुरवठा विभागाचे सहायक अभियंता डी.एम.हिवाळे यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरले.
आंदोलनात महादेव पठाडे, उपाध्यक्ष कैलास पवार, सुधाकर लवडकर, सातलिंग अंबुसे, सचिव गणेश राऊत, अशोक बेडगे, अनिल चौधरी, विशाल कुलकर्णी, वैशाली राऊत, कल्याणी पठाडे, ज्योती सुराशे, सत्यभामा कांदे,, अश्विनी मगरे, वंदना मुटकुरे, गिता जाधव आदींनी सहभाग घेतला. त्यानंतर सहायक अभियंता हिवाळे यांना निवेदन देण्यात आले.
सहा दिवसांनंतर पाणी देण्याचे आश्वासनसिडको परिसरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन वारंवार कोलमडत असल्याने नागरिक व सिडकोच्या अधिकाऱ्यात कायम संघर्ष सुरु आहे. सहायक अभियंता हिवाळे यांनी शुक्रवारी अनिल चोरडिया व सोसायटीतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन ६ दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. याच बरोबर तिसºया दिवशी टँकरने पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.