हल्ली पाण्याला नंबर, दळणाला नंबर, बिल भरण्यासाठी नंबर... साऱ्याच गोष्टीला नंबर लावले जात असल्याचे बघितले आहे. लसीकरणासाठी अधिक नागरिक असतील तर तिथे रांगेत उभे राहिलेले लोक पाहिले आहेत. मात्र, आज लसीकरणाचा एक मजेशीर किस्सा समोर आला. शहरातील एका होमिओपॅथी महाविद्यालयात लसीकरण केंद्र आहे. तिथे दुपारी १ वाजता लंच टाईम झाला म्हणून लसीकरण थांबविण्यात आले. नेमका त्यावेळी एका मध्यमवयीन व्यक्तीचा नंबर आलेला होता. मात्र, अर्ध्यावर लसीकरणाची प्रक्रिया थांबली आणि अडीच वाजेनंतर लसीकरण सुरू होईल, असे नर्सने सांगितले. तेव्हा त्या मध्यमवयीन व्यक्तीने नर्सकडे विचारणा केली, बाई माझा नंबर आला होता. अडीच वाजेनंतर पुन्हा नंबर लावावा लागेल का. तेव्हा समोरून गरज नाही, असे उत्तर मिळताच तो निघून गेला व बरोबर अडीच वाजता तो परत आला. तेव्हा रांगेत २०-२५ नागिरक उभे पाहून त्याने पुढे घुसण्याचा प्रयत्न केला. ते पाहून सुरक्षारक्षकाने त्याला चांगलाच दम भरला व सर्वांच्या मागे उभे केले. तेव्हा तो बिचारा त्या नर्सबाईंना सारखासारखा प्रश्न करत होता, बाई मी नंबर लावू का, असे तेव्हाच तुम्हाला विचारले होते ना... त्याची ही केविलवाणी अवस्था पाहून रांगेतील उभे सर्वांचेच मनोरंजन झाले !
कानावर हात...........
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:04 AM