येथील गट नंबर १३१ मध्ये रामेश्वर भिका बलांडे यांची शेतजमीन आहे. त्यांच्या शेतात कपाशीचे पीक आहे. सदरील कपाशीच्या पिकातूनच महावितरणच्या वीज तारा गेल्या आहेत. मात्र, या तारांकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. गुरुवारी दुपारी सुभद्राबाई काळे या आपल्या शेतातून गुरांसाठी वैरणीचा भारा डोईवर घेऊन या कपाशीच्या पिकातून जनावरांच्या गोठ्याकडे जात होत्या. सदरील विद्युत वाहिन्यांना स्पर्श होईल एवढ्या जवळ आल्या होत्या. परंतु कपाशीच्या शेतात रामेश्वर भिका बलांडे हे आपल्या पत्नीसह कापूस वेचत असताना त्यांनी आवाज देऊन क्षणार्धात थांबवले. त्यामुळे ही महिला बालंबाल बचावली गेली. यापूर्वीही महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे परिसरात अनेकदा हानी झाली आहे. त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देऊन तारांना ताण देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
लोंबकळणाऱ्या तारा बनल्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:05 AM