बीड : पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट जवळील संतकृपा हनुमानगड येथे मंगळवारपासून सात दिवसीय कीर्तन महोत्सवास प्रारंभ झाला.या निमित्ताने हनुमानगड परिसरात मोठ्या प्रमाणावर रोषणाई करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री रंधवे बापू महाराज यांचे कीर्तन झाले. पुढील आठवडाभर भारूड, पोवाडे हे कार्यक्रम होणार असल्याचे मठाधिपती बुवासाहेब महाराज खाडे यांनी सांगितले. बुधवारी अक्रूर महाराज साखरे, गुरूवारी कल्याण महाराज काळे, शुक्रवारी कैलास गिरी महाराज, शनिवारी धर्मराज महाराज, रविवारी दयानंद महाराज कोरेगावकर, सोमवारी रघुनंदन महाराज गर्जे यांचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन बुवासाहेब महाराज खाडे, राजू खाडे यांनी केले. सात दिवस अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. (प्रतिनिधी)
हनुमानगडावर कीर्तन महोत्सवास प्रारंभ
By admin | Published: March 28, 2017 11:27 PM