लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘मत पुछो हाल इस कैद का, आसान नहीं एक भी दिन तुम्हारे बिना इस जेल का’ असे म्हणत बंदिवानांनी अनेक महिन्यांनंतर चिमुकल्यांच्या घेतलेल्या ‘गळाभेटी’ने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे कारागृहाच्या भिंतींनाही मायेचा पाझर फुटला. निमित्त होते हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारे बंदी आणि त्यांच्या १६ वर्षांखालील मुलांची ‘गळाभेट’ या उपक्रमाचे.हर्सूल कारागृहात मंगळवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १११ कैद्यांनी आपल्या मुलांसोबत दोन तास घालविले. छोट्याशा चुकीपायी, क्षणभराच्या रागामुळे भोगाव्या लागणाºया शिक्षेने बाप-लेकरांमध्ये निर्माण झालेला दुरावा कारागृह प्रशासनाने गळाभेट या उपक्रमातून दूर केला. कार्यक्रमप्रसंगी कारागृह उपमहानिरीक्षक (मध्य विभाग) राजेंद्र धामणे, कारागृह अधीक्षक बी. आर. मोरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी. डी. काळे यांची उपस्थिती होती.शिक्षेमुळे कोणी सहा महिने, कोणी वर्ष, तर कोणी त्यापेक्षा अधिक वर्षांपासून मुलांपासून, कुटुंबापासून दूर झालेले होते. या उपक्रमाच्या निमित्ताने चिमुकल्यांना पाहून बंदिवानांतील पिता वेगळ्याच दुनियेत हरवला होता.डोळे भरून वडिलांना पाहण्यात मुलेही हरखून गेली होती. नकळत पाणावलेले, भेटीने भरून आलेले एकमेकांचे डोळे जो-तो पुसत होता. अश्रू भरल्या डोळ्यांनी मुले बºयाच वेळ पित्याच्या गळ्यातच पडून होती. सहा महिन्यांच्या आतील मुलांसोबत कु टुंबातील इतर सदस्यही सोबत आले होते. त्यामुळे मुलांबरोबर पत्नी, आई, बहीण, वडिलांचीही अनेक महिन्यांनंतर भेट झाल्याचे सुख बंदिवानांना मिळाले. एकत्र जेवणाचा आनंदही घेता आला. दोन तासांनंतर कारागृहातून परतानाही अश्रूंचा बांधच फुटला. जड पावलांनी जो-तो कारागृहाबाहेर पडला.यशस्वीतेसाठी वरिष्ठ तुरुंग अधिकारी ए. एस. गोसावी, आसद मोमीन, तुरुं ग अधिकारी आर. व्ही. उन्हाळे, बी. व्ही. मंचरे, सी. वाय. तायडे, पी. बी. रहेपाडे, विजय सोळंके, विजय मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.महाराष्ट्रातील कैदी पुढे गुन्हेगार बनत नाहीतअन्य राज्यांतील कारागृहात जाणारे कैदी पुढे गुन्हेगार बनतात; परंतु महाराष्ट्रात असे नाही. गळाभेट उपक्रमामुळे कैद्यांमधील तणाव कमी होण्यास मदत होते. विशेषत: रजा न मिळणाºया कैद्यांना कुटुंबाला भेटून समाधान होते, आनंद मिळतो, असे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे म्हणाले.
हर्सूल कारागृह : पाणावलेल्या डोळ्यांनी बंदिवानांनी घेतली लेकरा-बाळांची ‘गळाभेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:22 AM
‘मत पुछो हाल इस कैद का, आसान नहीं एक भी दिन तुम्हारे बिना इस जेल का’ असे म्हणत बंदिवानांनी अनेक महिन्यांनंतर चिमुकल्यांच्या घेतलेल्या ‘गळाभेटी’ने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे कारागृहाच्या भिंतींनाही मायेचा पाझर फुटला. निमित्त होते हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारे बंदी आणि त्यांच्या १६ वर्षांखालील मुलांची ‘गळाभेट’ या उपक्रमाचे.
ठळक मुद्देकठोर भिंतींनाही फुटला मायेचा पाझर