शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

हौसेला मोल नसते ! औरंगाबादकराने 111 फॅन्सी नंबरसाठी मोजले 2.10 लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 7:38 PM

आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली असते.

ठळक मुद्देचॉइस नंबरचे शुल्क वाढणार  आरटीओला मिळतो दरवर्षी कोट्यवधींचा महसूल

औरंगाबाद : वाहनांच्या नंबर प्लेटवर अनेकदा भाऊ, दादा, नाना, काका अशी नावे दिसतात. ही सर्व किमया फॅन्सी नंबरची असते. अशी नंबर प्लेट लावणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अशा नंबर प्लेटचे प्रमाण कमी झाले असले तरी फॅन्सी नंबर घेण्याकडे वाहनधारकांचा ओढा आजही कायम आहे. यासाठी कोणी श्रद्धेपाटी, तर कोणी हौसेपोटी १५ हजारांपासून २  लाखांपर्यंतची रक्कम मोजत आहेत. यावर्षी १११ या क्रमांकासाठी सर्वाधिक २ लाख १० हजार रुपये मोजण्यात आले.

हौसेला मोल नसते, असे म्हटले जाते. वाहनांसाठी घेण्यात येणाऱ्या चॉइस, फॅन्सी नंबरच्या बाबतीत हीच स्थिती आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली असते. एकाच नंबरसाठी अनेकदा जास्त अर्ज येतात. अशावेळी नंबरचा लिलाव केला जातो. लाखो रुपये मोजून नंबर घेतला जात आहे. त्यात आता वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होण्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे पसंती नंबरसाठी चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे.

या तीन नंबर्सना सर्वाधिक दर१११- दोन लाख १० हजार रुपये७००७- एक लाख ५० हजार रुपये१००१- एक लाख ५०  हजार रुपये

आरटीओची कमाई२०१९- २ कोटी ९२ लाख ८९ हजार रुपये२०२०-२ कोटी ७७  लाख ७७ हजार रुपये

शहरवासीयांची  विविध नंबरला पसंतीवाहनधारकांचा ९, ९९, ९९९,९९९९, २०२०, १०८, ७८६, ०२१४, ५१५१ अशा विविध नंबरकडेही ओढा दिसतो. अनेक जण जन्म तारीख, आपल्या पूर्वीच्या वाहनाचा क्रमांक घेण्यासही प्राधान्य देतात. सर्वसामान्य वाहनधारकांकडून १५ ते ५० हजारांदरम्यान शुल्क असलेला नंबर घेण्यास प्राधान्य दिले जाते.

पसंतीच्या नंबरसाठी अर्ज मागविण्यात येतात. काही ठरावीक नंबरकडे वाहनचालकांचा ओढा अधिक पाहायला मिळतो. पसंती नंबरसाठी आरटीओ कार्यालयात आकारण्यात येणारे शुल्क वाढीचा प्रस्ताव आहे. त्यासंदर्भात सध्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.- स्वप्नील माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद