शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

'तो हिटलर होता, म्हणून संपविला एकदाचा'; डॉ. राजन शिंदे खून प्रकरणात संशयितांकडून कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 11:38 AM

Dr. Rajan Shinde Murder Case: घटनेच्या पाचव्या दिवशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी खुनाबद्दल पोलिसांकडे पहिल्यांदाच कबुली दिली.

ठळक मुद्देहत्या करून विहिरीत टाकलेले शस्त्र काढण्यासाठी पाण्याचा उपसाखून करण्याचा उद्देशाविषयी मात्र पोलिसांना अजूनही विश्वास बसत नाही

औरंगाबाद : राज्यात गाजत असलेल्या प्रा. डॉ. राजन शिंदे खून प्रकरणाचे ( Dr. Rajan Shinde Murder Case ) गूढ जवळजवळ उकलले असून, ज्यांच्यावर संशय होता, त्यातील एकाने खून केल्याची कबुली ( Confession from suspects ) दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. तो हिटलर होता, म्हणून संपविला एकदाचा असे संशयिताने म्हटल्याचे समजतेय. आरोपीने खून करून ते शस्त्र घराजवळीलच विहिरीत टाकल्याचे सांगितले. त्यावरून विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याचे काम शनिवारी (दि. १६) दिवसभर सुरू होते.

ते शस्त्र सापडल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आरोपींची माहिती देण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. परंतु, खून करण्याचा उद्देशाविषयी मात्र पोलिसांना अजूनही विश्वास बसत नाही. मौलाना आझाद महाविद्यालयातील प्रा. डॉ. शिंदे यांचा सोमवारी (दि. ११) पहाटे खून झाला. या खुनाचा उलगडा करण्यासाठी शहर पोलीस दलातील तपास तरबेज अधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. घटनेच्या पाचव्या दिवशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या संशयितांनी खुनाबद्दल पोलिसांकडे पहिल्यांदाच कबुली दिली. त्यावरून मुख्य संशयिताची चौकशी करण्यात आली. त्यानेही खून केल्याचे कबूल करून त्यासाठी वापरलेले शस्त्र सिडको एन २ येथील महापालिकेच्या जागेतील विहिरीत टाकल्याचे सांगितले. सर्व संशयितांचे समोरासमोर जबाब नोंदविण्यात आले. यानंतर पोलिसांनी सहाव्या दिवशी दुपारनंतर संशयितांचे अधिकृत जबाब कागदोपत्री नोंदवून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. जबाब नोंदवून संशयितांना सायंकाळी सोडून देण्यात आले. या प्रकरणाचे गूढ उकलले असले तरी अद्याप पोलिसांच्या हातात सज्जड पुरावे मात्र नाहीत. त्यामुळे ते शस्त्र मिळाल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

विहिरीतून पाण्याचा उपसासंशयितांनी खुनाची कबुली दिल्यानंतर डॉ. शिंदे यांच्या घराजवळील विहिरीतील पाणी उपसण्याचे काम हाती घेण्यात आले. महापालिकेच्या मदतीने पाच एचपीचे दोन आणि दोन एचपीचे दोन अशा चार पंपांद्वारे पाणी उपसले जात आहे. दुपारनंतर या कामाने वेग घेतल्याची माहिती महापालिकेचे उपअभियंता राजू संधी यांनी दिली. विहिरीत ३५ फूट पाणी आहे. सर्व पाणी उपसल्याशिवाय ते शस्त्र सापडणार नाही. या पडीक विहिरीत कचरा टाकल्यामुळे त्यात गॅस असण्याची शक्यता आहे. पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी या विहिरीची शनिवारी सकाळीच पाहणी केली. त्यानंतर महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. के. पंडित, कनिष्ठ अभियंता गायकवाड आणि चौधरी हे लक्ष ठेवून आहेत. पोलीस प्रशासनाला आवश्यक ती मदत पोहोचविण्यात येत असल्याचे संधी यांनी स्पष्ट केले.

एकानेच केला खूनडॉ. शिंदे यांचा झोपेत असताना एकाने खून केल्याची कबुली इतर संशयितांनी दिली. हा खून टोकाच्या तिरस्कारातून झाल्याचेही समजते. मुख्य संशयिताच्या भीतीपोटी इतरांनी ही माहिती दडवून ठेवल्याचेही समोर येत आहे. संशयित चाणाक्ष असल्यामुळे तो सतत चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत होता. त्यामुळे पोलीस अधिक पुरावे गोळा करण्यावर भर देत आहेत.

पत्रकार परिषद घेणारपोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, खुनाचा ठोस पुरावा हाती आला की, या खुनाच्या प्रत्येक गोष्टीचा उलगडा पत्रकार परिषद घेऊन करण्यात येईल.

हेही वाचा : - प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी कोण ? कुटुंबातील सदस्यांचे चौकशीत पोलिसांना असहकार्य- डॉ. राजन शिंदे खुन प्रकरण : चौथा दिवसही पुराव्याविनाच; झुंबडा, उस्मानाबाद येथून पथक परतले

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद