शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

तिकीटही मागितले नव्हते त्याला उमेदवारी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून काँग्रेस पुन्हा हद्दपारच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 15:29 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेसने आपण कमकुवत आहोत, यावर शिक्कामोर्तब करून ठेवले.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातून काँग्रेस पुन्हा हद्दपार झाली. मागच्या विधानसभा निवडणुकीतही नऊपैकी एकही आमदार कॉँग्रेसचा नव्हता. यावेळीही तेच घडले. मुळात तिकीट वाटपातच कॉँग्रेसच्या पदरी निराशा पडली होती. औरंगाबाद पूर्वमध्ये कॉँग्रेसतर्फे उमेदवार देण्यात आला. पण त्या उमेदवाराचे सोशल इंजिनिअरिंग काहीच कामाचे ठरले नाही.

जिल्ह्यात काँग्रेसने आपण कमकुवत आहोत, यावर शिक्कामोर्तब करून ठेवले. मागच्या विधानसभा निवडणुकीतही पूर्वमधून काँग्रेसला सक्षम उमेदवार मिळाला नव्हता. यावेळीही निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांची राजकारणातील जोरदार एंट्री आणि त्याबरोबरच त्यांना पूर्वची जाहीर झालेली उमेदवारी ही बाब खळबळजनक ठरली. याचा आनंद मिळायच्या आतच सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली देशमुख यांची उमेदवारी बदलण्यात आली व ती लहुजी शेवाळे यांना जाहीर करण्यात आली. ही बाबही खळबळजनक ठरली.

तिकीटही मागितले नव्हते...वस्तुत: लहुजी शेवाळे यांनी काँग्रेस पक्षाकडे तिकीटही मागितले नव्हते. पण तिकीट मागणाऱ्यांना बाजूल सारून ते शेवाळे यांना जाहीर करण्यात आले. ते सुरुवातीपासूनच कमजोर ठरत गेले. किंबहुना त्यांच्यासाठी जशी यंत्रणा राबवावयास हवी होती, तशी राबवली गेलीच नाही. त्यामुळे त्यांना ही निवडणूक एकाकी लढवावी लागली. त्यांच्या उमेदवारीची कुणालाच भीती वाटली नाही.

वातावरण कॅश करून घेण्यात पडले कमी.....डॉ. कल्याण काळे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर फुलंब्रीच्या जागेवर काँग्रेसचे विलासबापू औताडे यांचा दावा प्रबळ बनला होता. इतर अनेक अपक्षांचा विचार न करता औताडे यांना उमेदवारीही मिळाली. हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल बनून गेल्यानंतर व भाजपमधल्याच इच्छुकांची नाराजी लक्षात घेतल्यानंतर तसेच शिंदे गटाचे रमेश पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांना फुलंब्री जड जाईल, असे वाटत होते. पण हे वातावरण कॅश करण्यात विलासबापू औताडे कमी पडले. आणि त्यांचा तब्बल ३२ हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे फुलंब्रीतूनही काँग्रेस हद्दपार झाली. जिल्ह्यातल्या अन्य कुठल्याच मतदारसंघांत काँग्रेसची स्थिती मजबूत नाही. नजीकच्या काळात जेव्हा केव्हा महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील, तेव्हा कॉँग्रेसचे काय होईल, ही चिंता आहेच.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्व