लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी शहरातील प्राचार्य व मुख्याध्यापकांची गुरुवारी बैठक झाली. यावेळी सर्व मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांनी १५, २० व २५ सप्टेंबर व १, ५ व १० आॅक्टोबर रोजी शाळांमध्ये मतदान जनजागृती प्रतिज्ञा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या या बैठकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आयुक्त गणेश देशमुख यांनी निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. मनपा स्तरावरुन मतदारांना जनजागृती पत्रके, बॅनर दिले जाते. त्या मार्फत जनजागृतीचे काम करावे. तसेच मतदानामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी ८०००६४४०१८ या टोल फ्री क्रमांकावर मिसकॉल द्यावा, असेही सूचित केले. मतदानाचा अधिकार, मतदानाचे महत्व या विषयावर चित्रकला स्पर्धा तसेच २९ सप्टेंबर रोजी विसावा उद्यानात रांगोळी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. या स्पर्धामध्ये शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
मुख्याध्यापक, विद्यार्थी घेणार जनजागृती शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:55 AM