शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

हेल्थ कॅम्पमध्ये नोकरीच्या अमिषाने गंडविणारा गुन्हेशाखेच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 5:35 PM

स्पर्श हेल्थ कॅम्पमध्ये नोकरीचे अमिष दाखवून तरुणांची आणि जनतेची फसवणुक करणा-या संस्थेच्या कर्यालयावर धाड मारून पोलिसांनी एका जणाला अटक केली.

औरंगाबाद - स्पर्श हेल्थ कॅम्पमध्ये नोकरीचे अमिष दाखवून तरुणांची आणि जनतेची फसवणुक करणा-या संस्थेच्या कर्यालयावर धाड मारून पोलिसांनी एका जणाला अटक केली. त्याच्याकडून बनावट पत्रके, बनावट नेमणुक प्रमाणपत्र, विविध बँकांचे धनादेश बुक, एटीएम कार्ड, मोबाईल,रोख रक्कम असा सुमारे १ लाख १५ हजार ७१० रुपयांचा ऐवज जप्त केला.दिलीप मंगरुस्वा गुप्ता(रा.रांची,झारखंड)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हेशाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी  यांनी सांगितले की, आरोपीने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन स्पर्श संस्थेला आरोग्य कामासाठी प्रत्येक पंचायतीसाठी सर्वेअर, तालुक्यामध्ये बीपीओ, नर्स, कम्पाऊंडर, लॅब टेक्नीशियन अशी पदे भरायची आहे. विशेष म्हणजे  आरोपीने काल्डा कॉर्नरवरील चेतनानगर येथील रूख्मिणी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर स्पर्श पब्लीक हेल्थ या नावाने कार्यालय उघडले होते. आरोपीने कार्यालय सुरू केल्यापासून तेथे मॅनेजर, टेलीकॉलर, प्रोगामिंग आॅफिसर, आॅफिस बॉय, वॉचमन आणि स्टेनोग्राफर आदी पदावर दहा कर्मचारी नेमले होते. विशेष म्हणजे ग्रामीण भागात काम करणाºया बेरोजगार तरुणांना त्याने दहा ते तीस हजार रुपये वेतन देण्याचे अमिष जाहिरातीत दाखविले होते. ही जाहिरात वाचून अनेकांनी त्याच्याकडे नोकरीसाठी अर्ज दाखल केले. त्यांच्याकडून फॉर्म भरून घेत प्रत्येकी एक हजार रुपये तो उकळत असल्याची माहिती खबºयाने गुन्हेशाखेला प्राप्त झाली. यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे,सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक अनिल वाघ, कर्मचारी मनोज चौहाण, भगवाान शिलोटे, शेख हकीम, संजय खोसरे, संतोष सुर्यवंशी,अय्युब पठाण, भावसिंग चव्हाण यांनी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी आरोपीच्या कार्यालयावर धाड मारली. यावेळी कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे आरोपीचे कामकाज सुरू होते. आरोपीची पोलिसांनी विचारपुस केली असता सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचे कामकाज नियमानुसार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला.  तेथे  बनावट पत्रके, बनावट नेमणुक प्रमाणपत्र, विविध बँकांचे धनादेश बुक, एटीएम कार्ड, मोबाईल,रोख रक्कम,लॅपटॉप आणि इतर साहित्य असा सुमारे १ लाख १५ हजार ७१०ऐवज जप्त केला.