लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यस्तरीय आरोग्य समितीने ११ ते १३ आॅक्टोबर या काळात परभणी जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आरोग्य सेवेची तपासणी केली. राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी या समितीने केली. यावेळी आरोग्य केंद्रातील प्रत्येक विभागामध्ये स्वच्छता ठेवण्याच्या सूचना समितीतील अधिकाºयांनी संबंधितांना दिल्या.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण, आशा कार्यक्रम, आयपीएचएस, टेलि मेडिसीन, मोबाईल मेडिकल युनीट, आयुष कार्यक्रम आदी प्रमुख ११ कार्यक्रम ग्रामीण भागात राबविले जातात. त्यात पायाभूत सुविधा व रुग्ण कल्याण समितीच्या कार्यक्रमांचाही समावेश आहे. २०१३-१४ पासून ते २०१७ पर्यंत राबविलेल्या योजनांचा आणि इतर आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी ३ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत केंद्र शासनाची आरोग्य सेवेची समिती जिल्हा दौºयावर येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा आढावा घेण्यासाठी ११ ते १३ आॅक्टोबर या तीन दिवसात राज्यस्तरीय आरोग्य समितीने जिल्ह्याचा दौरा केला.या समितीत सहाय्यक संचालक डॉ.रघुनाथ राठोड, सहसंचालक डॉ.रवंींद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली १३ अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश होता. या समितीने तीन दिवसात जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा आढावा घेतला. तसेच ग्रामीण भागातील आशा वर्कर्सच्या मुलाखती घेतल्या.आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाºया सुविधा, योजना आपणास माहीत आहेत का? या योजना रुग्णांपर्यंत पोहचतात का? आदी प्रश्न विचारुन जिल्ह्यातील आरोग्य विभागातर्फे रुग्णांना देण्यात येणाºया योजनांचा आढावा घेण्यात आला.सेलू, मानवत, झरी आदी ठिकाणच्या रुग्णालयांना समितीने भेटी दिल्या. ही समिती तीन दिवस जिल्हाच्या दौºयावर होती. समितीच्या दौºयामुळे आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच धावपळ झाल्याचे पहावयास मिळाले.
आरोग्य सेवेची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:18 AM