औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) जन औषध वैद्यकशास्त्र विभागांतर्गत शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्रातर्फे शालेय आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात ४५० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
विभागप्रमुख डॉ. मोहन डोईबळे, डॉ. जी. बी. सवासे,डॉ. रवींद्र पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रश्मी प्रिया, डॉ. सीमा मोहिते, डॉ. सुनयना कुमठेकर, डॉ. अपेक्षा पौनिकर, डॉ. पल्लवी पगडा, डॉ. संतोष राचोटकर, डॉ. महेंद्र साळवे आणि अंतरवासिता विद्यार्थ्यांतर्फे ही तपासणी करण्यात आली.