शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

आरोग्यसेवक पेपरफुटीची व्याप्ती वाढणार; अभ्यासिकेचा मालक नाशिकहून हलवत होता सूत्रं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 2:17 PM

The health dept exam scam गेवराई तांडा येथे धनश्री कृषी महाविद्यालयात आरोग्यसेवक पदाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या मदन बहुरे याला परीक्षा केंद्राच्या गेटवरच मायक्रो डिव्हाईसेससह चिकलठाणा पोलिसांनी अटक केली होती.

ठळक मुद्देप्रति उमेदवार १० ते १५ लाख रुपयांची सुपारी५ आरोपींना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवक पदाच्या परीक्षार्थींना ज्या अभ्यासिकेतून उत्तरे सांगितली जात होती, त्या अभ्यासिकेच्या मालकाला पोलिसांनी आरोपी केले आहे. आपला या गुन्ह्याशी संबंध नसल्याचे दाखविण्यासाठी तो नाशिक येथे जावून तेथून सुत्रे हलवत होता. या रॅकेटने किती उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्याची हमी दिली होती, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

मदन धरमसिंग बहुरे, राहुल धरमसिंग बहुरे, फुलबेग गुलाब बेग, रमेश हरिश्चंद्र बमनावत, संतोष माधवराव रगडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात खोकडपुरा येथील एमएमसी इमारतीत गजानन अभ्यासिका चालविणारा स्वप्नील शेषराव बाहेकर (रा. उदय कॉलनी, भोईवाडा) आणि अभ्यासिकेतून पळालेला पवन कवाळे यांचा सध्या पोलीस शाेध घेत आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, गेवराई तांडा येथे धनश्री कृषी महाविद्यालयात आरोग्यसेवक पदाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या मदन बहुरे याला परीक्षा केंद्राच्या गेटवरच मायक्रो डिव्हाईसेससह चिकलठाणा पोलिसांनी अटक केली होती. केंद्राबाहेर त्याचा भाऊ राहुलला तर अन्य दोन आरोपींना खोकडपुरा येथील गजानन अभ्यासिकेतून तर अन्य एकाला अन्य ठिकाणाहून अटक केली होती.

प्रति उमेदवार १० ते १५ लाख रुपयांची सुपारीसुत्रांनी सांगितले की, आरोपींपैकी काहीजण स्पर्धा परीक्षेची तर काही पोलीस भरतीची तयारी करत आहेत. त्यांनी आरोग्यसेवक पदभरती जाहीर होण्याआधीपासून उमेदवारांशी संपर्क साधून त्यांच्यासोबत १० ते १५ लाखांत नोकरीची हमी दिली होती. याकरिता त्यांनी मायक्रो डिव्हाईस इअर बड, एटीएम कार्डच्या आकाराचा मायक्रो मोबाईल ऑनलाईन खरेदी केला होता. कालच्या कारवाईत एक उमेदवार पोलिसांच्या हाती लागला तरी या रॅकेटने किती उमेदवार गळाला लावले होते आणि त्यांनी कितीजणाना असे साहित्य देऊन परीक्षा केंद्रात पाठवले होते, याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

५ आरोपींना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीसोमवारी दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. सी. कुंभारे आणि कर्मचाऱ्यांनी अटकेतील ५ आरोपींना न्यायालयात हजर केले. या आरोपींच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी कट रचून हा गुन्हा केला आहे, यामुळे त्यांना सात दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती फौजदार कुंभारे आणि सरकारी वकिलांनी केली. पोलिसांचे म्हणणे ग्राह्य धरुन न्यायालयाने त्यांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा