शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

आरोग्य सेवाच ‘आजारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 11:40 PM

आरोग्य सेवा ही मूलभूत गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही ‘आरोग्य’ हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु ही मूलभूत गरज आणि अधिकार मिळविण्यासाठी सर्वसामान्यांना अक्षरश: ‘यातना’ सहन कराव्या लागत आहेत.

ठळक मुद्देउपचारासाठी भटकंती : शासकीय रुग्णालयांची अपुऱ्या सुविधांच्या जोरावर रुग्णसेवा, खाजगी रुग्णालयांचा विस्तार

(जागतिक आरोग्य दिन विशेष)औरंगाबाद : आरोग्य सेवा ही मूलभूत गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही ‘आरोग्य’ हा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु ही मूलभूत गरज आणि अधिकार मिळविण्यासाठी सर्वसामान्यांना अक्षरश: ‘यातना’ सहन कराव्या लागत आहेत. कारण आरोग्य सेवाच सध्या ‘आजारी’ आहे. आरोग्याप्रती नागरिकांत जागरुकता वाढली. मात्र, शासकीय रुग्णालयांतील अपुऱ्या सुविधांमुळे उपचारासाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.दरवर्षी ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा या दिनाचे घोषवाक्य ‘सर्वांसाठी आरोग्य : प्रत्येकासाठी, प्रत्येक ठिकाणी’ हे आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाची ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३ उपजिल्हा रुग्णालये, ११ ग्रामीण रुग्णालये, औरंगाबादेत मिनी घाटी म्हणजे चिकलठाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. शहरात महापालिकेची ३४ आरोग्य केंद्रे आहेत. छावणी रुग्णालय आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आहे. आरोग्य सेवेचे एवढे मोठे जाळे आहे. परंतु या सर्वांना अपुरा निधी, अपुºया सोयी-सुविधांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचा फटका रुग्णांना बसत असून, उपचारासाठी इकडून तिकडे जाण्याची नामुष्की ओढावत आहे. या सगळ्यात खाजगी रुग्णालयांचा विस्तार झपाट्याने होत आहे.ग्रामीण रुग्णांना सरळ रेफरग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे, रुग्णालयांची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे सरळ शहरात रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे. घाटीत प्रसूतीसाठी ४० टक्क्यांवर गरोदर माता या ग्रामीण भागांतून येतात. जिल्हा सामान्य रुग्णालयात २२० पैकी केवळ ८० खाटांद्वारे रुग्णसेवा दिली जात आहे. ओपीडी आणि केवळ दोन आंतररुग्ण वॉर्ड याठिकाणी आजघडीला सुरू आहेत.मनपाची फक्त ओपीडी सेवामहापालिकेची ३४ आरोग्य केंद्रे आहेत. एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आरोग्य केंद्रांच्या ओपीडीत ४ लाख ३३ हजार २६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर आंतररुग्ण विभागात अवघ्या १ हजार २६८ रुग्णांवर उपचार झाले. यात प्रसूतींची संख्याही केवळ ३७० आहे. घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागात होणाºया प्रसूतीची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. अशा सगळ्यात मनपाच्या केंद्रांतूनही गंभीर रुग्णांसह छोट्या-छोट्या आजारांसाठी घाटीत रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे.‘घाटी’ची कसरतघाटीत गतवर्षी ओपीडीत ६ लाख ५१ हजार तर आयपीडीत ९८ हजार रुग्णांवर उपचार झाले. वर्षभरात १८ हजार प्रसूती झाल्या. एकूण ११७७ खाटा असताना १२०० ते १५०० रुग्ण दाखल होतात. त्यातून अनेकांना जमिनीवर उपचार घ्यावे लागतात. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सोयी-सुविधा अपुºया पडतात. रुग्णालयाला प्रतिजैविके, अ‍ॅन्टिरेबीज व्हॅक्सिन, मेट फारमिन, आयसो सरबाईट, अशा मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. वर्षभरापासून एक सिटी स्कॅन बंद आहे. कॅ थलॅब बंद आहे. अनेक व्हेंटिलेटर बंद आहेत. वर्षभरात फक्त १० नवीन यंत्रे आली.रुग्णांचा कलचांगल्या दर्जाच्या सेवा ज्याठिकाणी मिळतात, त्याठिकाणी जाण्याकडे रुग्णांचा कल असतो. आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी हेल्थ वेलनेस क्लिनिकची संकल्पना सुरू केली आहे.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालकअधिक चांगली सेवाआरोग्य विभाग, महापालिकाची यंत्रणा सक्षम झाली तर घाटीत रेफर होण्याचे प्रमाण कमी होईल आणि टर्शरी केअर सेंटर म्हणून रुग्णालय अधिक नावारुपाला येईल. सुपर स्पेशालिटी विभाग, एमसीएच विंग, शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विस्ताराने रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळेल.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)सर्वांनी एकत्र काम करावेआरोग्य सेवा मिळणे, हा सर्वांचा हक्क आहे. शासकीय आणि खाजगी सेवांनी नागरिकांना योग्य आणि वेळेत आरोग्य सेवा दिल्या पाहिजे. सर्वांनी आपापल्या स्तरावर आणि सर्वांनी एकत्र येऊन नागरिकांना चांगली आरोग्य सेवा दिली पाहिजे.- डॉ. निता पाडळकर, आरोग्य अधिकारी, मनपा ------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य