शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

जिल्हाभरात उष्णतेची लाट कायम; दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य, बाजारपेठेत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 6:22 PM

सूर्यास्तानंतरही उष्णतेची लाट कायम राहत आहे.

औरंगाबाद : उन्हाळ्यात दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होतात, असे चित्र पूर्वी फक्त विदर्भात दिसे. मात्र, यंदा एप्रिल महिन्यात विक्रमी तापमानाने शहरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शहर आणि जिल्ह्यात सहा दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे.

शहरात सोमवारी (दि.२९) कमाल तापमान ४३.१, तर किमान तापमान २६.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. दोन दिवस ६१ वर्षांपूर्वीच्या विक्रमी तापमानाची बरोबरी केल्यानंतर सोमवारी तापमानात किंचित घट झाली. मात्र, तापदायक वातावरण अजूनही कायम आहे. 

रणरणत्या उन्हामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी पाहायला मिळत आहे. शहरात सोमवारीदेखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. सकाळपासून सायंकाळपर्यंत उन्हाच्या झळांमुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. जालना रोड, रेल्वेस्टेशन रोड, गुलमंडीसह विविध भागांत सायंकाळी ६ वाजेपर्यंत फारशी वर्दळ दिसून आली नाही. परिणामी, बाजारपेठेतही शुकशुकाट राहत आहे.

सायंकाळनंतरही प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक जण थंड पेय पिण्यासाठी गर्दी करतात. पंखे, कूलर खरेदीसाठीही गर्दी दिसून येत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे उष्माघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. 

उन्हाच्या तडाख्याने महिलेला भोवळउन्हाच्या तडाख्यामुळे एका महिलेला भोवळ आल्याची घटना सोमवारी हडको परिसरातील रस्त्यावर घडली. सदर महिला भोवळ येऊ न रस्त्यावर पडल्याचे दिसताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पाणी देऊन महिलेला रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले. खाजगी रुग्णालयांत कमी-अधिक प्रमाणात सौम्य उष्माघाताचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत.

सूर्यास्तानंतरही गरम हवासूर्यास्तानंतरही उष्णतेची लाट कायम राहत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतर वातावरणात गरम हवा राहत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. यामुळे शहरवासीय हैराण होत आहेत. वाहन चालविताना उन्हाच्या झळांनी दुचाकीचालक त्रस्त होऊन जात आहेत. डोक्याला रुमाल, त्यावर हेल्मट परिधान केल्यानंतरही उन्हाची झळ सहन करण्याची वेळ दुचाकीचालकांवर येत आहे. 

शहरात असे राहिले तापमान

दिनांक     तापमान२४ एप्रिल    ४१.६२५ एप्रिल    ४२.५२६ एप्रिल    ४३.०२७ एप्रिल    ४३.६ २८ एप्रिल    ४३.६२९ एप्रिल    ४३.१

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHeat Strokeउष्माघातNatureनिसर्ग