छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील २६ मंडळात बुधवारी रात्रीतून जाेरदार पाऊस झाला. ६५ मि.मी.च्या पुढे पाऊस गेल्यामुळे अतिवृष्टीची नाेंद हवामान खात्याने घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७, जालन्यातील ३ , बीडमधील १, नांदेड जिल्ह्यातील दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाबतारा मंडळात ११० मि.मी. पाऊस झाला. ११८ मि.मी. जास्तीचा पाऊस झाल्याचे आकडे सांगत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील तीन मंडळात वेगाने पाऊस झाला. मराठवाड्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली असून विभागात ११७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात ६५ मि.मी.,भावसिंगपुरा मंडळात ७१, लाडसावंगी ८९, हर्सूल ७८, चौका मंडळात ६७ मि.मी. पाऊस झाला. पैठण तालुक्यातील बालानगर मंडळात ६५, गंगापूर तालुक्यातील मांजरी मंडळात ६९, शेंदूरवादा ६७, वैजापूर शहरात ९७ मि.मी, महालगाव ८३, नागमठाण ७४, लाडगाव ९७, घायगाव ९७, बाबतारा ११० मि.मी. पाऊस झाला. सिल्लाेड तालुक्यातील अंभई मंडळात ६७, सोयगाव तालुक्यातील बनोटी मंडळात ८०, फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा मंडळात ७७ मि.मी. पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा मंडळात ६८ मि.मी, जाफ्राबाद शहरात ६८, टेंभुर्णी ६८, वागरूळ ७०, मंठा तालुक्यातील ढोकसळ मंडळात ९३ मि.मी, बीड जिल्ह्यातील पाटोदा शहरात ७२ मि.मी. तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चांदोळा मंडळात ८३ मि.मी व मुखेड शहरात ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली. मराठवाड्याची वार्षिक सरासरी ६७९ मि.मी. असून ७९७ मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्हानिहाय झालेला पाऊसजिल्हा...........२६ सप्टेंबरचा पाऊस.........एकूण टक्केवारीछत्रपती संभाजीनगर.....४५ मि.मी..........१२९ टक्केजालना......२४ मि.मी......................१३२ टक्केबीड....१३ मि.मी.......................१३५ टक्केलातूर....७ मि.मी. ......................१११ टक्केधाराशिव....८ मि.मी. ...............१२० टक्केनांदेड....१३ मि.मी. ................१०६ टक्केपरभणी....८ मि.मी....................१०७ टक्केहिंगोली....७ मि.मी...................११० टक्केएकूण....१८ मि.मी. ................११७ टक्के