छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने सहा जिल्ह्यांत दमदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या सहा जिल्ह्यांतील ५० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २० पैकी आठ मंडळांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. यातील आठ मंडळांत १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला.
सप्टेंबर महिन्यांतील २४ दिवसांत ७ दिवस पाऊस झाला आहे. विभागात अजूनही २४ टक्के पावसाची तूट कायम आहे. पावसाळा संपण्यास सहा दिवस शिल्लक आहेत. मागील वर्षी ७४५ मि.मी. म्हणजेच ११५ टक्के पाऊस झाला होता. यंदा ५२० मि.मी. म्हणजेच ७६.६ मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी नांदेड जिल्ह्यात पूर्ण झाली आहे. मिलीमीटरच्या तुलनेत विभागात एक इंच पाऊस झाला आहे.रविवारी सकाळपासून विभागात काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. दिवसभर मात्र पावसाने उघडीप दिली होती.
मराठवाड्यात एका दिवसात किती बरसला...२५.६ मि.मी.मराठवाड्याची वार्षिक सरासरी किती...६७९.५ मि.मी.
मागीलवर्षी किती बरसला होता...७४५.४ मि.मी. (११५.३ टक्के)किती मंडळांत १०० मि.मी.च्या पुढे....१४ मंडळांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस
काेणत्या जिल्ह्यातील मंडळांत अतिवृष्टी...छत्रपती संभाजीनगर : भावसिंगपुरा : ७६ मि.मी., कांचनवाडी १११ मि.मी., चितेपिंपळगाव १५१ मि.मी., हर्सूल ७८ मि.मी., कचनेर ६७ मि.मी., पंढरपूर ७६ मि.मी., वरूडकाझी ६५ मि.मी., आडूळ ८१ मि.मी., पिंपळवाडी ७० मि.मी., बिडकीन १२४ मि.मी., डोणगाव १०६ मि.मी., वैजापूर ७० मि.मी., शिऊर १०६ मि.मी., लोणी ६५ मि.मी., गारज १२४ मि.मी., लासूरगाव ७१ मि.मी., देवगाव ६५ मि.मी., वेरूळ १२५ मि.मी., आमठाणा ७० मि.मी., तर अंंभई मंडळात ११८ मि.मी. पाऊस झाला.जालना जिल्हा : ग्रामीण १३१ मि.मी., शेवली ७५ मि.मी., रामनगर ७१ मि.मी., पाचनवडगाव ७१ मि.मी., अंबड ६६ मि.मी., धर्मापुरी १०४ मि.मी., जामखेड ९० मि.मी., रोहिलागड ७७ मि.मी., बदनापूर १५४ मि.मी., तर रोशनगाव मंडळात १०१ मि.मी. पाऊस झाला.बीड जिल्हा : आष्टी ६८ मि.मी., कडा ९३ मि.मी., दावलवडगाव ८९ मि.मी., धानोरा १३२ मि.मी., पिंपळा ७२ मि.मी., अंबाजोगई ७२ मि.मी., लोखंडी ७२ मि.मी., बर्दापूर १०६ मि.मी., तर धर्मापुरी मंडळात ६९ मि.मी. पाऊस झाला.नांदेड जिल्हा : येवती ८९ मि.मी., जहूर ८९ मि.मी., अंबुलगा ८९ मि.मी., शहापूर ८४ मि.मी., तर नारंगल मंडळात ८४ मि.मी. पाऊस झाला.परभणी जिल्हा : पाथरी ९५ मि.मी., बादलगाव १३२ मि.मी., तर मानवत मंडळात ९५ मि.मी. पावसाची नोंद झाली.हिंगोली जिल्हा : दिग्रस ७२ मि.मी., अंबा ७४ मि.मी., तर येहलगाव मंडळात ७२ मि.मी. पावसाची नोंद झाली.
मराठवाड्यातील धरणांत किती पाणी...मराठवाड्यातील जायकवाडीसह ११ मोठ्या प्रकल्पांत ४५.९६ टक्के उपयुक्त जलसाठा सध्या आहे. मागील वर्षी ९५ टक्के पाणी ११ प्रकल्पात होते. जायकवाडीत ३ टक्के पाण्याची वाढ झाली आहे.