शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

मराठवाड्याला पावसाचा जोरदार तडाखा; साडेतीन लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 8:28 PM

३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचे नुकसान ; पाच जिल्ह्यांतील पिकांना पावसाचा तडाखा

औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन ४१ दिवस झाले आहेत. या ४१ दिवसांत मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पेरण्यानंतर बुड धरलेली ही पिके आगामी काळातील पावसात उभी राहतील की नाही, याबाबत शंका आहे. ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात (८ ते १८ जुलै) जोरदार पावसाने साडेतीन हजारांहून अधिक गावांतील पिकांना पावसाचा फटका बसला आहे. विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जालना ५० हेक्टर, परभणी १२०० हेक्टर, हिंगोली १५ हजार ९४४, नांदेड ३ लाख ३० हजार ८७९, तर लातूर जिल्ह्यातील १५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर बाधित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

४७६ हेक्टर जमीन गेली वाहूनजालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ४७६ हेक्टर जमीन अतिपावसामुळे वाहून गेली आहे. फळपिकांचे ५८ हेक्टर, बागायत ५ हजार ४९९ हेक्टर, जिरायत ३ लाख ३२ हजार ५३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जालन्यातील ३७७, परभणीतील १५००, हिंगोलीतील १९ हजार १९७, नांदेडमधील ३ लाख ३० हजार ३५७, तर लातूरमधील १८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

१० जण गेले पुरात वाहूनमराठवाड्यात ८ जुलैपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे विभागातील काही जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले. ४१ दिवसांतील पावसाळ्यात १० जण पुरात वाहून गेले आहेत. २४ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. भिंत पडून एकजण दगावला आहे. दुभती जनावरे, पिकांचे नुकसान व मालमत्तांच्या पडझडी झाल्या. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ७७९ कच्ची, तर तीन पक्की घरे पावसाने पडली आहे. २९८ लहान-मोठी दुधाळ जनावरे, तर १२० ओढकाम करणारी जनावरे दगावली आहेत. बीड जिल्ह्यातील एक, तर नांदेडमधील सात पुलांचे पावसामुळे नुकसान झाल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. सात कि.मी.चे रस्ते वाहून गेले आहेत.

ओल्या दुष्काळाची चाहूल : ४०५ मि.मी. पाऊसविभागात आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४०५ मि.मी. पाऊस झाला आहे. २४२ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. १६३ मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. ५९ टक्के पावसाचे प्रमाण असून, उर्वरित ७३ दिवसांच्या पावसाळ्यात ४० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला, तर ओल्या दुष्काळाचा सामना विभागाला करावा लागण्याची शक्यता आहे. आजवर झालेल्या पावसामुळे काही जिल्ह्यांत ओल्या दुष्काळाची चाहूल लागली आहे.

टॅग्स :agricultureशेतीMarathwadaमराठवाडाRainपाऊस