शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

मराठवाड्यावर धोधो बरसला! ५० टक्के सरासरी आताच गाठली; उर्ध्व, गाेदावरी नदीचे पात्र दुथडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 6:34 PM

१४ लाख ८३ हजार १४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग; मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १३ जुलै रोजी दुपारपर्यंत ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : जायकवाडी ते तेलंगणापर्यंतचे निम्न व नाशिक ते जायकवाडीपर्यंतचे ऊर्ध्व गोदावरी नदीचे पात्र गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. निम्न गोदावरी पात्रात सरासरी १४ लाख ८३ हजार १४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून यात जायकवाडी, श्रीरामसागर, श्रीपदा यल्लपल्ली प्रकल्प, लक्ष्मी बॅरेज, पीव्हीएन. राव कातनपल्ली प्रकल्पातील विसर्गाचा समावेश आहे. जायकवाडी धरणात ६.१ टीएमसी पाणी वाढले आहे; तर उर्वरित चार प्रकल्पांमध्ये १२८ टीएमसी पाण्याची सरासरी वाढ झाल्याचे निम्न गोदावरी विभाग, हैदराबादच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.

ऊर्ध्व गोदावरी पात्रातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नाशिक ते जायकवाडीपर्यंत प्रकल्पांमध्ये ५६ टक्के जलसाठा सध्या झाला असून, नाशिक पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १३ जुलै रोजी दुपारपर्यंत ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १२३ पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाला आहे. आजवर ३३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ऊर्ध्व गोदावरी पात्रातून एवढा विसर्गजायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील २५ पैकी ९ धरणांतून १ लाख १ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे सगळे पाणी सध्या जायकवाडी येत आहे. धरणातील पाणीपातळी सध्या ५० टक्क्यांच्या आसपास गेली आहे. करंजवणमधून ११५५, वाघाड ११४७, पालखेड ९४३६, गंगापूर १० हजार, कादवा ३५१७, दारणा ८८४६, नांदुर मधमेश्वर ६५ हजार, पुणेगाव १३०६, तर आळंदी प्रकल्पातून २४३ क्युसेक पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे.

मराठवाड्यातील प्रकल्पांत ५० टक्के पाणीमराठवाड्यातील ११ जलप्रकल्पांत सध्या ५० टक्के पाणी आले आहे. त्यात जायकवाडीत ५० टक्के, निम्न दुधना ६८, येलदरी ५८, सिद्धेश्वर १२ टक्के, माजलगाव ३४, मांजरा २९, पैनगंगा ५९, मानार ६२, निम्न तेरणा ५३, तर विष्णुपुरी जलप्रकल्पात ८४ आणि सिना कोळेगाव प्रकल्पात १७ टक्के पाणी आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी जलसाठा वाढला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेती