छत्रपती संभाजीनगर : राज्यात सर्वत्र जोरदार पावसामुळे भरभराट होत असताना मराठवाड्यात ठणठणाट आहे. ५८ दिवसांत फक्त ४२ टक्के पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ५७ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरित जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. जून व जुलै महिन्यांतील सरासरीच्या तुलनेत ८ टक्के पावसाची तूट असल्याने खरीप हंगामातील पीक पेरण्यांचा पहिला टप्पा पावसाअभावी संपुष्टात आला आहे.
मराठवाड्यात ४५० मंडळ असून, त्याअंतर्गत सुमारे ८ हजार ५०० गावांचे पर्जन्यमानाची मोजमाप होते. मागील ५८ दिवसांत विभागातील १४९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. २ हजार ८९० गावांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून, उर्वरित ५ हजार ५२० गावांमध्ये कमी-अधिक पाऊस झाल्याने खरीप पेरण्या संकटात आहेत.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाळ्यात ६७९.५ मिमी सरासरी पावसाचे प्रमाण असून, मागील ५८ दिवसांमध्ये २९१.१ मिमी पाऊस झाला आहे. १५५ टक्के म्हणजेच ४६१ मि.मी. पाऊस मागील वर्षी झाला होता. ३४० मि.मी. पाऊस या दोन महिन्यांत होणे अपेक्षित होता. ५० मि.मी. पावसाची तूट आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांवर परिणाम झालाच आहे. शिवाय ११ मोठ्या प्रकल्पांसह मध्यम १०७ व लघु ७४९ प्रकल्पांमध्ये कमी जलसाठा आहे. ५८ दिवसांत मोठ्या प्रकल्पांमध्ये आजवर फक्त ४७५ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. गेल्यावर्षी गोदावरी खोऱ्यात आजवर २८० मि.मी. पाऊस झाला होता.
मोठ्या प्रकल्पांची सद्य:स्थिती अशी....प्रकल्प...........टक्केवारीजायकवाडी.....२९.७९निम्न दुधना.....२७.८७येलदरी...५९.४०सिद्धेश्वर....३२.९४माजलगाव...१६.२८मांजरा.....२४.४८पेनगंगा.....५९.४९मानार....३८.८४निम्न तेरणा...२९.३६विष्णुपुरी....५२.२०सिना कोळेगाव...०.००
जिल्हा.......झालेला पाऊसऔरंगाबाद....२३२ मि.मी.जालना....२३९ मि.मी.बीड.......२०७ मि.मी.लातूर ....२८१ मि.मी.धाराशिव....२२९ मि.मी.नांदेड.....४६८ मि.मी.परभणी...२४९ मि.मी.हिंगोली...३६९ मि.मी.एकूण....२९१ मि.मी.