छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद, लातूरवगळता उर्वरित जिल्ह्यांतील ४७ मंडळांमध्ये १९ जुलै रोजी सकाळपर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ७ जुलैनंतर दमदार पाऊस बरसला असून, एकाच दिवसात सहा जिल्ह्यांतील मंडळातील पावसामुळे वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५ टक्के पाऊस झाला आहे. आजवर ३०.५ टक्के पाऊस विभागात बरसला आहे.
४ जुलै ते बुधवार ५ जुलै सकाळी ८ वाजेदरम्यान विभागातील १४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर बुधवार ५ जुलै ते गुरुवार सकाळी ८ वाजेपर्यंत विभागातील आठही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. ३७ मंडळांत दमदार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जून महिन्यात ५९ टक्के पावसाची तूट राहिली. जुलै महिन्यांतही तशीच परिस्थिती आहे.
आजवर मराठवाड्यात १०६ मंडळात अतिवृष्टी झाली आहे.या जिल्ह्यातील मंडळात दमदार बरसला :जालना : विरेगाव ६९ मि.मी.बीड : कडा ६५ मि.मी.धाराशिव: नळदुर्ग ६९ मि.मी., वालवड ६७ मि.मी., डाळिंब ७२ मि.मी., जेवळी ७२ मि.मी.नांदेड : नांदेड शहर ७६ मि.मी. ग्रामीण ७० मि.मी. विष्णुपुरी ६९ मि.मी. लिंबगाव १५३ मि.मी. नालेश्वर ८८ मि.मी. कुंडलवाडी ६७, मालकोळी ७७ मि.मी. साेनखेड ८० मि.मी. मोघाली ९५ मि.मी. मुखेड ७६ मि.मी. मुगत ६५ मि.मी. बारड ७० मि.मी. कारखेळी ९० मि.मी. जरीकोट ७९ मि.मी. उमरी १२७ मि.मी. गोळेगाव १३३ मि.मी. सिंधी ७३ मि.मी. धानोरा ६६ मि.मी. अर्धापूर ७६ मि.मी. दाभाड ८७ मि.मी. मालेगाव ६९ मि.मी.परभणी : पेढगाव ७२ मि.मी., सांगवी १०७ मि.मी. बामणी १०७ मि.मी., आडगाव ७८ मि.मी. मोरेगाव ७० मि.मी.हिंगोली : हिंगोली शहर १२० मि.मी, नर्सी १२२ मि.मी, बसांबा १२२ मि.मी, दिग्रस ११९ मि.मी, मालहिवरा ८१ मि.मी., खंबाळा १२६ मि.मी., टेंभुर्णी ७५ मि.मी., औंढा ७८ मि.मी., येहलेगाव ७८ मि.मी. सालना ७८ मि.मी. जवळा ७६ मि.मी.
आठ मंडळात १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस.....हिंगोली शहरासह बसांबा, दिग्रस, परभणीतील सांगवी, बामणी तर नांदेडमधील गोळेगाव, उमरी, लिंबगाव या आठ मंडळात १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे मोठ्या धरणात फारसे पाणी आलेले नाही.