औरंगाबाद : मराठवाड्यातील ६७ मंडळांना ३१ ऑगस्टच्या सकाळपर्यंत नोंदविल्या गेल्या पावसाचा तडाखा बसला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ३८.६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक ७५.२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील ३३ मंडळांत जाेरदार पाऊस झाला. या सगळ्या मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ७ मंडळांत ढगफुटीसारखा पाऊस बरसला आहे.
विभागात जरी ६७ मंडळांत अतिवृष्टी झाली असली ऑगस्ट महिन्यातील सरासरीच्या तुलनेत आजवर झालेला पाऊस कमी आहे. १९४ मि.मी.च्या अपेक्षित पावसाच्या सरासरीपैकी १७२ मि.मी. पाऊस झाला आहे. २२ मि.मी. पावसाची तूट सध्या आहे. विभागाचे एकूण पर्जन्यमान ६७९.५ मि.मी. इतके आहे. विभागात सर्व जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच ६७ मंडळांत एकाच दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ६ जणांचा पावसाने बळी घेतला आहे, तर ४ गायी आणि २ बैलही पावसात दगावले.
२४ मंडळांत १०० मि.मी.च्या पुढे नोंद
मराठवाड्यातील २४ मंडळांत १०० मि.मी.च्या पुढे पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा वेग जास्त होता. ६५ मि.मी. पर्यंत पाऊस होणे म्हणजे अतिवृष्टीची सर्वसाधारण नोंद होते. परंतु त्यापुढे झालेला पाऊस ढगफुटीसारखा असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.
अतिवृष्टीची नोंद झालेले जिल्हे असे
औरंगाबाद- जिल्ह्यात पैठण तालुक्यातील विहामांडवा ११२ मि.मी., वैजापूरमधील लोणी मंडळात ६६ मि.मी., कन्नड मंडळात ११० मि.मी., चापानेर ७६ मि.मी., चिकलठाण ६५ मि.मी., पिशोर ११६ मि.मी.,नाचनवेल ६८ मि.मी., चिंचोली १०९ मि.मी., करंजखेड ८० मि.मी. पावसाची नोंद झाली.
जालना- जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव मंडळात ९९ मि.मी.,अंबडमध्ये ८९ मि.मी.,जामखेड ६९ मि.मी., रोहिलागड ७१ मि.मी., घनसावंगी ७८ मि.मी., तीर्थपुरी १२१ मि.मी., कुंभार पिंपळगाव ८५ मि.मी., अंतरवली ८६ मि.मी. पावसाची नोंद झाली.
बीड - जिल्ह्यातील ३३ मंडळांत पावसाचा जोरदार तडाखा बसला. यात बीड शहर मंडळ १११ मि.मी., पाली ९९, म्हसलजा १६६ मि.मी., नाळवंडी १९० मि.मी., पिंपळनेर २१४, पेंडगाव ११८, चौसाळा ७७, नेकनूर ८०, अमळनेर १६२, आष्टी ६६, दावलवाडी १२६, धामणगाव ६७, धानोरा ६९, पिंपळा ६६, गेवराई ९४, मादळमोही १११, जातेगाव ८४, पांचगाव ७४, उमापूर १००, चकलांबा ११७, शिरसदेवी ८१, रेवाकी ७६, तलवाडा २३४, तालखेड ८२, अंबाजोगाई ७४, पाटोदा १६०, लोखंडी ७२, घाटनांदूर ८०, धर्मापूरी ७८, वडवणी ८९ मि.मी., तर कावडगांव ११५, शिरूर ६५, रायमोह मंडळात ९१ मि.मी. पावसाची नोंद झाली.
लातूर- जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव मंडळात १२० मि.मी., निलंगा ७६, पानगांव ८४, कारेपूर मंडळात ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली.
उस्मानाबाद- जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव मंडळात ९२ मि.मी. पावसाची नोंद झाली.
नांदेड- जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ९७ मि.मी., जांब ६६, चांडोळा १२७, कुरूला ८२, लोहा ७६, मलकोळी १३७, खानापूर मंडळा १०५ मि.मी. पाऊस बरसला.
परभणी- जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील हदगाव मंडळात १३० मि.मी. कासापुरी १०६, पालम ६८, बनवस ११० तर पेठशिवण मंडळात ९७ मि.मी. पावसाने हजेरी लावली.
हिंगोली- जिल्ह्यात सर्वधिक कमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १०.९ मि.मी. इतका पाऊस झाला.