शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

हॅलो... मी अंगणवाडी सेविका बोलतेय!; २४ एप्रिलपर्यंत ३० हजार मोबाईल होणार ‘अ‍ॅक्टिव्हेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 7:01 PM

अंगणवाडी सेविकाही आता होणार ‘हायटेक’

ठळक मुद्देमे महिन्यात अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण१६ एप्रिलपासून मोबाईल ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करण्याचे काम सुरु

- विजय सरवदे 

औरंगाबाद  : बालकांच्या दैनंदिन नोंदी, लसीकरण, गृहभेटी, स्तनदा माता, गरोदर माता व किशोरी मुलींच्या आरोग्याच्या नोंदी तसेच पोषण आहाराचे वाटप आदींच्या विविध ११ रजिस्टरमध्ये नोंद घेणे व त्यांची देखभाल करण्याच्या कटकटीपासून अंगणवाडी सेविकांची सुटका होणार आहे. १ जूनपासून थेट मोबाईलमध्येच सर्व प्रकारच्या नोंदी घेतल्या जाणार असल्यामुळे अंगणवाडी सेविकाही आता ‘हायटेक’ होणार, असे मानायला हरकत नसावी.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे सर्व प्रकारच्या नोंदी घेणारे ‘कॅस’ हे अ‍ॅप व सीमकार्ड तब्बल ३० हजार मोबाईलमध्ये ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. १५ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात जवळपास १५ ते १६ हजार मोबाईल आले आहेत. १६ एप्रिलपासून औरंगाबादेतील १४० व नाशिक जिल्ह्यातून आलेले २० ‘ब्लॉक को-आॅर्डिनेटर’ असे एकूण १६० जण मोबाईल ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करण्यामध्ये गुंतलेले आहेत. याठिकाणी मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांसोबत अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविकांसाठी मोबाईल ‘अ‍ॅक्टिव्हेट’ केले जाणार आहेत. शनिवारपर्यंत याठिकाणी ५ हजार मोबाईल परिपूर्ण झाले असून, २४ एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. 

१६ एप्रिलपासून मोबाईल ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करण्याचे काम देवगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात सुरू होते. शनिवारी ते उद्योजकता विकास विभागाच्या सभागृहात स्थलांतर करण्यात आले. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या सूपरवायझरना चार टप्यात प्रशिक्षण घेतल्यानंतर या मास्टर ट्रेनरमार्फत सर्व अंगणवाडी सेविकांना मे महिन्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर १ जूनपासून अंगणवाडी सेविका  या मोबाईलवरच नोंदी घेतील.

ऑनलाईन नोंदीमुळे होईल वेळेची बचत अंगणवाडी सेविका  दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजन, उंचीच्या नोंदी, लसीकरण आदींच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेत आहेत. यापुढे  अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिला जाणार असून, त्याद्वारे सर्व दैनंदिन नोंदी व कामांचा आढावा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार आहे.

मे महिन्यात अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण‘कॅस’ सॉफ्टवेअर अर्थात ‘अ‍ॅप’ तसेच सीमकार्ड ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करण्याची प्रक्रिया २४ एप्रिलपर्यंत चालेल. रोजच्या रोज त्या- त्या जिल्ह्यांना मोबाईल अपडेट करून पाठविले जातील. त्यानंतर औरंगाबादेतील साधारणपणे ३ हजार अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले जातील. तत्पूर्वी, ८ ते १२ मेदरम्यान चार सत्रांत अंगणवाडी सुपरवायझरला प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या सुपरवायझरमार्फत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईलमध्ये रोजच्या रोज नोंदी कशा घ्यायच्या, याचे प्रशिक्षण दिले जाईल. साधारणपणे १ जूनपासून अंगणवाडी सेविका रजिस्टरऐवजी मोबाईलमध्येच सर्व प्रकारच्या दैनंदिन नोंदी घेतील.- प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :MobileमोबाइलState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद