श्यामकुमार पुरेसिल्लोड : तालुक्यात बोंडअळीमुळे शेतकºयांच्या कापसाचे नुकसान झाल्यानंतर जाहीर झालेल्या मदतीत तालुक्यातील सहा मंडळांवर अन्याय करण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने हा अन्याय केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.बोंडअळीमुळे आलेले कापूस पीक हातचे गेले. याबाबत नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र पंतप्रधान पिकविमा योजना, चाचणी प्रयोग, मागील ५ वर्षांचे पीक कापणी प्रयोग, नमुना सॅम्पल पद्धत, सांख्यिकी आकडे असे विविध निकष लावून जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील ६ महसूल मंडळे वगळली. यामुळे तालुक्यातील १८ हजार ७७५ शेतकरी पात्र ठरले आहे तर ५९ हजार ७२० शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत. विविध निकष लावून वगळण्यात आलेल्या महसूल मंडळात अजिंठा, बोरगाव बाजार, अंभई, गोळेगाव बु, निल्लोड, भराडी यांचा समावेश आहे. तर ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान होऊन पात्र ठरलेल्या गावात सिल्लोड व आमठाणा हे दोन मंडळ आहेत.बोंडअळीचे पंचनामे तालुका प्रशासनाने केले. सर्व आठ मंडळात ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा पातळीवर कृषी अधीक्षक कार्यालयात व जिल्हा अधिकाºयांना दिला. मात्र त्यात जिल्हा पातळीवर विविध निकष लावून केवळ सिल्लोड व आमठाणा या महसूल मंडळातील शेतकरी पात्र ठरवले गेले.जिल्हाधिकाºयांनी जाहीर केलेल्या यादीत सिल्लोडचे ३३.१३ टक्के, आमठाणा ३६.८४, अजिंठा २९.२७, बोरगाव बाजार १३.९१, अंभई १८.७, गोळेगाव बु. १७.०५, निल्लोड ६.४७, भराडी १.२३ टक्के नुकसान दाखविले आहे. ज्या गावात ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्या गावचे पंचनामे करून याद्या पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी जिल्हा कृषी अधीक्षक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहेत.कोट......तर गंभीर परिणामसिल्लोड -सोयगाव तालुक्यात बोंडअळीमुळे सर्वत्र ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तसा अहवाल तालुका प्रशासनाने पाठविला आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून ६ मंडळातील शेतकºयांना ३३ टक्यांच्या आत नुकसान दाखवून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासनाने शेतकºयांची चेष्ठा करू नये. असे झाल्यास शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, शेतकºयांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.-आ. अब्दुल सत्तारशासन आदेशदोन हेक्तरपर्यंत जमीन धारण करणारे शेतकरी कोरडवाहू शेतकºयांना ६८०० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे २ हेक्टरपर्यंत, किमान १ हजारापेक्षा कमी नाही. बागायतीसाठी १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे किमान १ हजारापेक्षा कमी नाही. वरील प्रमाणे शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी दि. रा. बागणे यांनी शुक्रवारी प्रशासनास दिले आहेत.बदल कसा झाला, माहीत नाहीसिल्लोड तालुक्यातील सर्व ८ महसूल मंडळातील ७८ हजार ४९५ शेतकºयांचे ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल आम्ही जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यात कसा बदल झाला, मी सांगू शकत नाही. पण या अहवालावर तहसीलदार, गटविकास अधिकारी व माझ्या सह्या आहेत.- सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी, सिल्लोड
बोंडअळीच्या मदतीत सिल्लोड तालुक्यावर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:48 AM