औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील रस्ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच चर्चेचा विषय बनले आहेत. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरातील रस्ते दर्जेदार असावेत यादृष्टीने मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पुढाकार घेतला आहे. सिमेंट आणि डांबरी रस्त्यांचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ विकास ठक्कर यांच्या उपस्थितीत शनिवारी मनपा अभियंत्यांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत ठक्कर यांनी गुळगुळीत रस्ते कसे तयार करावेत यावर मार्गदर्शन केले.इंडियन रोड काँग्रेसचे सदस्य विकास ठक्कर यांनी शनिवारी सकाळी शहरातील रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित कार्यशाळेस हजेरी लावली. शहरातील रस्त्यांचा दर्जा, रस्ते तयार करण्यापूर्वी घ्यावी लागणारी काळजी, पाण्याचा निचरा करणे, अशा विविध उपाययोजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यूएसएमधील रहिवासी विकास ठक्कर हे व्हाईट टॅपिंग व ब्लॅक टॅपिंगच्या रस्त्याचे तज्ज्ञ आहेत. यावेळी आयुक्त बकोरिया, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, हेमंत कोल्हे यांच्यासह सर्व उपअभियंते, अभियंते उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांसाठी तज्ज्ञांची घेतली मदत
By admin | Published: June 05, 2016 12:08 AM