छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवर प्रवास करताय? तर ‘ए भाय, जरा देखके चलो’, हे गीत या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना आठवल्याशिवाय राहत नाही. या भागातील रहिवाशांना रात्री-अपरात्री घर गाठताना अतिदक्षता ठेवत वाहन चालवावे लागते, अशी परिस्थिती आहे.
बीड बायपास एके काळी मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जायचा. नागरिकांच्या आंदोलनामुळे अखेर शासनाने या रस्त्याची रुंदी वाढवून पुलासह सिमेंटीकरणाचे काम हाती घेतले. आता या रस्त्यावरील वाहतूक दुपटीने वाढलेली आहे. जड वाहनांचा प्रवासही नियमानुसार सुरू असला तरी स्थानिक नागरिकांना घर गाठणे जिकिरीचे वाटते. देवळाई, संग्रामनगर, एमआयटी या तिन्ही पुलांखालून प्रवास करताना कोण समोरून येतोय आणि कोणाला कुठे जायचेय, हेच उमजत नाही.
रस्ता रुंद झाला; तुटलेल्या जाळ्यांचे काय? बायपासवरील तुटलेल्या लोखंडी ग्रील आपल्या सोयीनुसार व्यावसायिकांनी तोडल्या की वाहनाने तुटल्या, हा अभ्यासाचा विषय आहे. सा. बां. विभाग याबाबत काहीच बोलत नाही. तुटक्या जाळ्या सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी.- प्रा. भारती भांडेकर, रहिवासी
जनतेच्या जिवाशी खेळू नकारस्ता मोठा झाला असला तरी बहुतांश ठिकाणी तो अपूर्ण आहे. जनतेच्या जिवाशी खेळू नका; अन्यथा नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलनाच्या तयारीत आहेत.- अशोक तिनगोटे, माजी ग्रा. पं. सदस्य