संपूर्ण राज्यात सुरूअसलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय पारा जबरदस्त वाढताना दिस आहे. नेते मंडळींचे आरोप प्रत्यारोप अधिकाधिक धारदार होताना दिसत आहे. यातच आता गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब विरोधक आणि त्यांच्या सभेत गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर जाम भडकले आहेत. एढेच नाही, तर त्यांनी यावेळी, आपले प्रतिस्पर्धक तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मराठवाड्याचे पदवीधर आमदार सतिश चव्हाण यांना थेट आव्हानही देऊन टाकले. बंब गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे बोलत होते.
काय म्हणाले प्रशांत बंब...? -सभेत गोंधळ निर्माण करणाऱ्यांसंदर्भात बोलताना बंब म्हणाले, "अरे माझ्या सभेत चार-पाच गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो मी गावात जाऊ लागलो, हेच भाषण करू लागलो, हेच सांगू लागलो. मुद्दाम, काय करतात? पाच मिनिटे झाली की चार पाच मुले उठतात आणि मला विचारतात तुम्ही हे-हे-हे का नाही केलं? मी त्यांना ऐकून घेतो आणि सांगतो की, बेटा मी हे केले आहे. हे बघ हा पुरावा. मग लोक सांगतात, हो यांनी केलेलं आहे. सांगितल्या प्रमाणे. जितके सांगितले त्यापेक्षा जास्त केले."
पण मुद्दा हा आहे की... -पुढे बोलताना बंब म्हणाले, "यानंतर, दुसरंच काही तरी विचारतात. अर्धा तास मुद्दा माझ्या प्रश्नांशी जे संबंधित नाही, असं विचारतात. तरी मी त्यांना सांगतो. पण मुद्दा हा आहे की, माझी डेव्हलपमेंट लोकंपर्यंत पोहोचूच नये, मला बोलू देत नाहीत मुद्दाम, असे शडयंत्र रचून मला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांना सांगू इथे माझी जनता, माझ्या ताई लोक एवढे खुळे नाहीत. त्यांना सर्व समजतं."
आमदार सतिश चव्हाण यांना थेट आव्हान -बंब म्हणाले, "माझ्या समोर जे उभे आहेत त्यांना माझे जाहीर आव्हान आहे, त्यांनी 17 वर्षात काय केले त्याचा लेखा जोखा द्यावा. माझी त्यांना आणि मीडियाला विनंती आहे की, तुम्ही सगळे मीडिया वाले माझी आणि त्यांची समोरासमोर बसवून आमच्या दोघांचे कामे विचारात. समोरासमोर बसवा, तयार आहे मी. येणारच नाही येथे, चॅलेंज आहे. सगळ्या मीडिया वाल्यांनी त्यांना विनंती करायची आहे की, तुम्ही पदवीधर आमदार आहात आणि हा 15 वर्षापासून आमदार आहे. मग एक काम करा, समोरासमोर बसा. तुम्ही तुमची कामे सांगा, मी माझी कामे सांगतो. जर माझ्या 10 टक्के कामे जरी त्यांनी केली असतील, तर मी राजीनामा देऊन त्याचा कार्यकर्ता बनून जाईल. आणखी आता काय बोलू? संपूर्ण राज्याच्या समोर बोलतोय."