बीड : मटका लावण्यासाठी बुकी गाठणे, त्याला रोख पैसे देऊन कागदाच्या चिटोरीवर आकडा घेणे व ‘ओपन-क्लोज’ची वाट पाहत आकडा लागला की नाही हे तपासायला पुन्हा बुकीकडे जाणे, मटक्याची ही किचकट पध्दत आता बदलली आहे. मटक्याच्या आकड्यांचा खेळ आता ‘हायटेक’ झाला आहे. कोडवर्डद्वारे जिल्ह्यात लाखोंची उलाढाल होत असल्याची माहिती पुढे आली आहे.पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी मटका, जुगार, अवैध दारू, गुटखा आदी अवैध धंद्यांचा सफाया करण्यासाठी मोहीम हाती घेतलेली असताना पोलिसांना हुलकावणी देत आॅनलाईन मटक्याचा खेळ चांगलाच रंगत आहे. बसल्या जागेवरून आॅनलाईन आकडे निवडून मटका खेळला जात आहे. आॅनलाईन लॉटरीला परवानगी आहे मात्र त्याआडून काही ठिकाणी आॅनलाईन मटक्याच्या धंद्यानेही बाळसे धरल्याची माहिती समोर येत आहे. आॅनलाईन मटका खेळणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरूण, व्यापारी हे पुढे आहेत. काही मटकाबहाद्दरांनी तर सोशल मीडियावर स्वतंत्र ग्रुप बनवून आकड्यांचा बाजार मांडला आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्दवस्त होत असून, मोहापायी तरूणाई मटक्याच्या आकड्यात गुंतली आहे. (प्रतिनिधी)आॅनलाईन लॉटरीसाठी परवाना मिळतो. कायद्याचे त्याला सुरक्षा कवच आहे. मात्र, मटक्याच्या बाबतीत अशी स्थिती नाही.४मटका आॅनलाईन असो की आॅफलाईन, तो कायद्याच्या चौकटीत नियमबाह्यच आहे. आॅनलाईन लॉटरीत जॅकपॉट, डेली सुपर, चंदेरी बाजार आदी संज्ञा रूढ आहेत. यातील जॅकपॉट ही संज्ञा आॅनलाईन मटक्यासाठी देखील वापरली जाते४आॅनलाईन मटक्याचा तपास लावण्याची प्रक्रिया पोलिसांसाठी किचकट आहे. आकडा मटक्याचाच आहे हे सिध्द करणे काही वेळा अवघड बनते.आॅनलाईन मटक्यामध्ये बक्कळ पैसा आहे. उलाढालही मोठी आहे. एक रूपयाला ८० रूपयापर्यंतचा भाव मिळत असल्याने आॅनलाईन मटक्याचे तरूणांना आकर्षण आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीनेही हे सोयीचे असल्याचे अनेकांना वाटते.
एक रुपयाला ८० रुपये भाव आकड्यांचा ‘हायटेक’ खेळ
By admin | Published: March 14, 2016 12:08 AM