एकाच वेळी मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळल्याने उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेनिकर, तालुका वैद्यकीय अधिकारी बाळकृष्ण लांजेवार, मंडळाधिकारी दिनकर पाटील यांनी टापरगाव येथे भेट दिली.
शनिवारी ४० संशयित रुग्णांची चाचणी केली होती. यात चार कुटुंबातील तब्बल १७ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. त्यांच्या संपर्कातील ३२ नागरिकांची चाचणी केल्यानंतर बुधवारी (दि. २४) नऊजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन घोषित केल्याचे सरपंच रूपाली मोहिते यांनी सांगितले. ग्रामविकास अधिकारी प्रवीण नलावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत गावंडे, तलाठी देशमुख यांच्या चमूने बाधित रुग्णांशी संपर्क साधला.
फोटो : टापरगावात रुग्णसंख्या वाढत असल्याने अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
250321\img_20210323_122557_1.jpg
टापरगावात रुग्णसंख्या वाढत असल्याने अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.