रेड्डी कंपनीच्या तक्रारींमध्ये वाढ
औरंगाबाद : शहरातील संपूर्ण कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने २ वर्षांपूर्वी रेड्डी कंपनीची नेमणूक केली. कंपनीने प्रत्येक घरी जाऊन नागरिकांकडून कचरा जमा केला पाहिजे असा करार आहे. मात्र, कंपनी डोअर टू डोअर कलेक्शन करण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. महापालिका पूर्वी ज्या ठिकाणी कचरा पडला तेथून संकलन करण्याचे काम करीत होती. तसेच काम कंपनीने सुरू केले आहे. काही वसाहतींमध्ये कंपनीचे कर्मचारी दोन-दोन दिवस कचरा नेण्यासाठी येत नाहीत.