शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

हिंगोली जिल्ह्यात रबीच्या ७८ टक्के पेरण्याच पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 4:51 PM

यंदा परतीच्या पावसाने रबीच्या पेरण्यांना मोठा विलंब झाला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अद्यापही पेरण्या सुरू पेरण्या करताना वीज, पाण्याची मोठी अडचण

हिंगोली : जिल्ह्यात रबीची रखडलेली पेरणी कॅनॉलला पाणी आल्याने काही प्रमाणात वाढली आहे. आता रबीची पेरणी ७८ टक्के आटोपली असून काहींना विलंबाने पाणी मिळाल्याने अजूनही पेरणी करण्यात येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

यंदा परतीच्या पावसाने रबीच्या पेरण्यांना मोठा विलंब झाला. त्यातही शेतकऱ्यांना अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे होण्यासाठी शेतातच सुड्या ठेवण्याची वेळ आली होती. तर काहींनी काढणीची पसरच पंचनाम्यात दिसावी म्हणूनही विलंब केला. त्यामुळे दीपावलीनंतरही बराच काळ ही शेत रिकामे झाले नव्हते. त्यानंतर मशागत व इतर कामांत वेळ गेल्याने रबीच्या पेरण्या लांबल्या होत्या. त्यातही विजेची समस्या व कॅनॉलचे पाणी मिळत नसल्याने अनेकांना पेरणी करण्यास विलंब झाला. यंदा गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता होती. मात्र उसाची लागवड वाढल्याने गव्हाचा पेरा त्या तुलनेत कमी झाला आहे. गहू ४४ हजार हेक्टरवर अपेक्षित असताना १८ हजार ४७३ हेक्टरवर पेरणी झाली.  हरभऱ्याचा पेरा मात्र वाढला असून ७२ हजार ८५६ हेक्टरवर अपेक्षित असताना ९१ हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याचबरोबर रबी ज्वारी १२ हजार ५१ हेक्टरवर अपेक्षित असताना ७५४१ हेक्टर, रबी मका हजार हेक्टरवर अपेक्षित असताना ४२0 हेक्टर, इतर तृणधान्य ५0९ हेक्टर अपेक्षित असताना १८२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा दोन लाख हेक्टरवर रबी पेरणी अपेक्षित होती. मात्र तेवढे क्षेत्र गाठता आले नसल्याचे चित्र असून आणखी पेरणी सुरूच आहे.

कळमनुरी, वसमतचे रबीचे क्षेत्र घटलेयंदा कळमनुरी व वसमत तालुक्यात रबीची पेरणी कमी झाली. मात्र या दोन्ही तालुक्यांत उसाचे क्षेत्र वाढले आहे. कळमनुरीत अपेक्षित ४0 हजार ५६६ पैकी २७४0७ हेक्टर तर वसमतला ४१८0८ हेक्टरपैकी १८८0३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.४औंढा नागनाथ तालुक्यात १५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी अपेक्षित असताना १९ हजार ९३४ हेक्टरवर झाली. सेनगावात २१ हजार ६९२ हेक्टर अपेक्षित असताना २१ हजार ६११ हेकटरवर झाली. तर हिंगोलीत ३0 हजार ५0२ हेक्टरवर अपेक्षित असताना ३0 हजार ३३४ हेक्टरवर पेरणी झाली. जिल्ह्यात काही प्रमाणात सुर्यफूल, करडई, जवस आदी पिकेही घेण्यात आली आहेत. मात्र त्याच्या नोंदी दिसत नाहीत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र