लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्याद्वारे आधार बेस्ड् व्यवहारांचे प्रमाण ५0 टक्क्यांवर गेले असून हिंगोली जिल्हा राज्यात तिसºया क्रमांकावर आहे.या योजनेत काही महिन्यांपूर्वी ई-पॉस मशिनचे वितरण केल्यानंतर आधार व्हेरिफाईड व्यवहार करण्याचा सराव करण्यास दुकानदारांना सांगण्यात आले होते. मात्र दैनंदिन कामाच्या फेºयात दुकानदारांनी त्याला फाटा दिला. त्यानंतर प्रशासनाने सक्ती केली. आधार बेस्ड् व्यवहारच करण्यास सांगितले. असे व्यवहार न करणाºयांवर कारवाईचा इशारा दिला. दुकानांची तपासणी केली. तेव्हा अशा व्यवहारांचे प्रमाण ५0 टक्क्यांच्या पुढे सरकले होते. आता एवढे प्रमाण कायम आहे. यापुढेही त्यात वाढ होणे शक्य आहे. मात्र कनेक्टिव्हिटी व इतर अडचणींमुळे ते शक्य होत नसल्याचे दुकानदारांचे म्हणने आहे. तर हे प्रमाण आणखी वाढण्यासाठी दुकानदारांनी योग्य ते प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी लतिफ पठाण यांनी केले आहे.राज्यातील ५२ हजार दुकानांपैकी ५१ हजार दुकानांत ई-पॉस मशिन आहेत. या सर्व दुकानांतून झालेल्या १.१३ कोटी व्यवहारांपैकी ३७.४५ लाख व्यवहार हे आधार बेस्ड झालेले आहेत.
ई-पॉस प्रणालीत हिंगोली तिसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 12:40 AM