औरंगाबाद : एडीसीए स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत हिंगोलीने लातूर संघावर १ डाव आणि २७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हिंगोलीच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या सत्यजित नायक याने या लढतीत ८५ धावांत एकूण १० गडी बाद केले.सत्यजित नायकच्या भेदक माºयासमोर लातूरचा पहिला डाव २८.३ षटकांत अवघ्या १११ धावांत ढेपाळला. लातूरकडून यश बारगेने एकाकी झुंज देत १० चौकारांसह ४९ धावा केल्या. सत्यजित नायकने ५७ धावांत ७ गडी बाद केले. विकास मस्केने २७ धावांत २ व ज्ञानेश्वर शिंदेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात हिंगोलीने पहिल्या डावात २४० धावा करीत लातूरवर १२९ धावांची आघाडी घेतली. हिंगोलीकडून शेखर चौधरीने १०४ चेंडूंत ३ चौकारांसह ५१, कर्णधार सत्यजित नायकने ३ चौकारांसह ४३ धावा केल्या. स्वप्नील इंगळे व नीवेश गोरे यांनी प्रत्येकी २८, तर सय्यद मुज्जमीलने २६ व राहुल जाधवने २२ धावा केल्या. लातूरकडून कार्तिक गोविंदपूरकरने ६८ धावांत ४ गडी बाद केले. ऋषिकेश फुलेने ३ व यश बारगेने २ गडी बाद केले. पहिल्या डावात पिछाडीवर पडणारा लातूरचा दुसरा डावही हिंगोलीने १०२ धावांत गुंडाळत दणकेबाज विजयावर शिक्कामोर्तब केले. हिंगोलीकडून विकास मस्केने १४ धावांत ४, ज्ञानेश्वर शिंदेने ३४ धावांत ३ व पहिल्या डावात ७ बळी घेणाºया सत्यजित नायकने २८ धावांत ३ गडी बाद केले. लातूरकडून दुसºया डावात सौरभ शेवलकर (२३), अर्जुन कवाले (२१) व यश बारगे (१८) यांच्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकला नाही.
हिंगोलीचा लातूरवर दणदणीत विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:51 AM
एडीसीए स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत हिंगोलीने लातूर संघावर १ डाव आणि २७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हिंगोलीच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या सत्यजित नायक याने या लढतीत ८५ धावांत एकूण १० गडी बाद केले.
ठळक मुद्देसत्यजितचा भेदक मारा : ८५ धावांत घेतले एकूण १० बळी