शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

अस्मितादर्शचे सांस्कृतिक-साहित्यातील योगदान ऐतिहासिक !

By admin | Published: January 15, 2017 1:08 AM

लातूर :बँकांना गब्बर करण्याचा प्रयत्न गब्बरसिंग मोदींनी केल्याची टीका प्रसिद्ध साहित्यिक डॉ़ प्रज्ञा दया पवार यांनी शनिवारी लातुरात केली़

लातूर : बड्या उद्योगपतींची कर्जे माफ करुन, त्यांना देशाबाहेर पळून जायला मदत केल्यावर आर्थिक संकटात सापडलेल्या बँकांमध्ये जनतेच्या खिशातला कष्टाचा पैसा सक्तीने जमा केला़ त्यानंतर तो काढण्यावर नवनवीन नियमांद्वारे बंदी घालून बँकांना गब्बर करण्याचा प्रयत्न गब्बरसिंग मोदींनी केल्याची टीका प्रसिद्ध साहित्यिक डॉ़ प्रज्ञा दया पवार यांनी शनिवारी लातुरात केली़अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या़ प्रज्ञा पवार म्हणाल्या, नोटाबंदीमुळे सरकारने एकप्रकारे कृत्रीम स्वरुपाचा नवाच तीव्र दुष्काळ निर्माण केला आहे़ हा दुष्काळ गरीब शेतकऱ्यांचे, शेतमजूर, वंचित अन् विशेषत: स्त्रिया यांना भरडणारा ठरला आहे़ गरीबांचे, स्त्रियांचे, छोट्या उद्योजकांचे, स्वयंरोजगार करणाऱ्याचे यामुळे अपरिमित नुकसान झाले आहे़ हे सगळे होताना सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांकडून डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या चलनविषयक विधानांचा गैरवापर केला जात असल्याची टीकाही प्रज्ञा पवार यांनी केली़ राज्यभरात सध्या निघत असलेल्या वेगवेगळ्या क्रांती मोर्चांबद्दल त्या म्हणाल्या, जातींचे महामोर्चे काढणे ही आजच्या काळात सोपीच बाब बनली आहे़ राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे पीक आले़ त्यात प्रतिगामी व पुरोगामी खांद्याला खांदा लावून चालू लागले़ तेव्हा सगळ्यांनाच काहिसं हबकायला झालं़ पण लवकरच मग दलितांचे, ओबीसींचे व मुस्लिमांचेही लाखा-लाखांचे मोर्चे निघू लागले़ या निमित्ताने अ‍ॅट्रासिटी कायद्याची उलटसुलट चर्चा झाली़ जातीय अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला़ देशाच्या व्यवहारातून जात संपली आहे, जी थोडीफार जीवंत आहे ती दलित, मागासांमुळेच असं मानणाऱ्या प्रस्थापितांची बोलती यामुळे बंद झाली़ अस्मितादर्शविषयी बोलताना त्या म्हणाल्या, अस्मितादर्शचे सांस्कृतिक, वाङ्मयीन योगदान ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे़ मराठी साहित्यात साठ-सत्तरच्या आगेमागे फुले-आुंबेडकरवादी विचारविश्वातून प्रेरणा घेत ‘दलित साहित्य’ नावाची महत्वाची साहित्य चळवळ निर्माण झाली़ हा भारतातील सर्वात मोठा तलस्पर्शी वैचारिक झंझावात होता़ या वैचारिक उर्जेला साक्षात रण्याची, सर्जनशील राखण्याची, प्रवाही ठेवण्याची सर्वार्थाने कष्टप्रद असलेली ध्येयनिष्ठ वाटचाल प्रतिकूल परिस्थितीतही डॉग़ंगाधर पानतावणे यांच्या माध्यमातून अस्मितादर्शने अव्याहतपणे सुरु ठेवल्याचे प्रज्ञा पवार यांनी सांगितले़ बोलण्याचे विषय तर बरेच आहेत़ तरीपण मी बोलणार आहेच, असेही त्या म्हणाल्या़