वाळूज : वाळूज परिसरातील देगांव, भैरेवाडी मनगोळी, साखरेवाडी, भागाईवाडी शिवारात रान डुकरांनी हैदोस घातला आहे. यामुळे पिकांची आणि फळबागांची नासधूस केल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाळूज येथील शिवारात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या ज्वारी हुरड्यात आली आहे. ज्वारीचे धाटे अर्धवट तोडून कुरतडत आहेत. यामुळे ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच फळबागामधील पेरू, डाळिंब, केळी या पिकांचे नुकसान केले आहे. हनुमंत जाधव यांच्या शेतातील कांदा, सागर घाडगे यांच्या शेतातील कांदे पेरू आणि दादा कादे यांच्या शेतातील डाळिंब तर वैभव मोटे, भाऊ खांडेकर, मिलिंद लामगुंडे, प्रताप घोडके, रेवणसिध्द साखरे या सर्वांच्या ज्वारीचे मोठया प्रमाणात नुकसान केले आहे, अशी तक्रार त्यांच्याकडून केली जात आहे.