शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

प्रशासकांच्या आदेशानंतरही होर्डिंग उभारणी सुरूच; मुख्य रस्त्यांवर पसरतोय अंधार, प्रशासन गप्प

By मुजीब देवणीकर | Published: February 15, 2024 11:09 AM

जालना रोडवर उभारण्यात आलेल्या होर्डिंगमुळे एका बाजूला रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.

छत्रपती संभाजीनगर : सिडको उड्डाणपुलाजवळ दुभाजकात होर्डिंग उभारणीसाठी केलेल्या खड्ड्यामुळे गॅस गळतीची घटना १ फेब्रुवारीला घडली. या घटनेनंतर प्रशासक जी. श्रीकांत यांनी होर्डिंग उभारणीस ‘ब्रेक’ लावला होता. प्रशासकांच्या आदेशानंतरही जालना रोडसह मुख्य रस्त्यांवर युद्धपातळीवर होर्डिंग उभारणी सुरूच आहे. विशेष बाब म्हणजे प्रत्येक होर्डिंग मनपाच्या पथदिव्यांसमोर लावल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरू लागले. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत बसथांबे उभारण्याचे काम एका खासगी एजन्सीला दिले. या एजन्सीने बसथांब्यांवर जाहिराती लावून बसथांब्याचा खर्च काढून घ्यावा, असे ठरले. कंपनीने १५० पैकी १२० बस थांबे उभारले. त्यानंतर एजन्सीला स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बसथांब्याच्या बाजूला होर्डिंग उभारण्याची परवानगी घेतल्याची चर्चा आहे. यापुढे जाऊन एजन्सीने मुख्य रस्त्यांवरील दुभाजकात मोठे होर्डिंग उभारण्याची परवानगी मिळवली. मुळात स्मार्ट सिटीला अशा पद्धतीचे काम काम मनपाला न विचारता देण्याचे अधिकार आहेत का? हे सर्व काही करीत असताना मनपाच्या मालमत्ता विभागाची साधी एनओसी घेतली नाही. वाहतूक पाेलिसांनाही कळविले नाही.

गॅस गळतीच्या घटनेनंतर एजन्सीच्या कामाचे बिंग फुटले. प्रशासक जी. श्रीकांत यांन त्वरित काम थांबविण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी एजन्सीने फाऊंडेशन उभारले होते, तेथे मागील आठ दिवसांत रात्रीतून मोठे होर्डिंग लावून टाकले. यामुळे नागरिकही चकीत झाले.

वाहतुकीचा प्रश्नही गंभीरहोर्डिंग उभारताना रस्त्यापासून त्याची उंची किती असावी, या निकषांचा विचारच झालेला नाही. हिमायतबाग उद्धवराव पाटील चौकातील होर्डिंगमध्ये उंच कापसाचा ट्रकही अडकून अपघात होऊ शकतो, एवढी कमी उंची आहे.

दिव्याखाली अंधारस्मार्ट सिटीच्या एजन्सीने जालना रोडसह मुख्य ठिकाणी होर्डिंग उभारले, तेथे मनपाच्या पथदिव्यांचा प्रकाश जाहिरातींवर फुकटात पडेल, अशी सोय केली. विरुद्ध बाजूला विशाल होर्डिंगमुळे अंधाराचे साम्राज्य पसरत आहे, याचा विचारच एजन्सीने केलेला नाही.

अंधाराच्या ठिकाणी लाईट लावावास्मार्ट सिटीच्या होर्डिंगमुळे मुख्य रस्त्यांवर अंधार पडत असेल तर संबंधित एजन्सीने वीज कनेक्शन घेऊन दुसऱ्या बाजूलाही लाईट लावायला हवेत.- ए.बी. देशमुख, शहर अभियंता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका