शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

बिलासाठी मृतदेह धरला रोखून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:04 AM

:सव्वा लाखाच्या बिलासाठी मृतदेह रोखुन ठेवला :सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांची मध्यस्थी; साडेपाच तासानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात बजाजनगरातील ममता ...

:सव्वा लाखाच्या बिलासाठी मृतदेह रोखुन ठेवला

:सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांची मध्यस्थी; साडेपाच तासानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

बजाजनगरातील ममता हॉस्पिटलमधील प्रकार : सव्वा लाखाच्या बिलासाठी साडेपाच तास नातेवाईकांना ठेवले ताटकळत

वाळूज महानगर : सव्वा लाखाचे बिल भरण्यावरून कोविड रुग्णाचा मृतदेह सुमारे साडेपाच तास रोखून ठेवल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.२४) बजाजनगरातील ममता हॉस्पिटलमध्ये घडली. सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर साडे पाच तासानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

या विषयी अधिक माहिती अशी की, सिडको वाळूजमहानगरातील एका ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना ३ मे रोजी बजाजनगरातील ममता मेमोरियल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले. रुग्णालयात भरती केल्यानंतर नातेवाईकाकडून तात्काळ १ लाख रुपये अनामत रक्कम घेण्यात आली. दरम्यान, रुग्णालयाकडून दररोज औषधीच्या खर्चापोटी जवळपास अडीच ते तीन लाख रुपये रुग्णांच्या नातेवाईकाकडून वसूल करण्यात आले. अर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही रुग्णाचे नातेवाईक उसनवारी करुन उपचाराचा खर्च भागवित होते. जवळपास तीन आठवडे उपचार करुनही रुग्णाच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नसल्याने तसेच रुग्णाची प्रकृती खालावत चालल्याने नातेवाईकात चिंतेचे वातावरण पसरले होते. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाईकांना तुमच्या रुग्णाचे निधन झाल्याचे सांगितले.

नातेवाईक सकाळपासून बसून

उपचारासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करुनही घरातील कमावत्या व्यक्तीला वाचविण्यात यश न आल्याने हतबल झालेल्या कुटुंबीयाकडून बिल वसूल करण्यासाठी ममता हॉस्पिटलकडून दबाव टाकण्यास सुरवात करण्यात आली. रुग्णालयाकडून उपचाराचे १ लाख १९ हजार रुपये भरण्यास मयताच्या नातेवाईकास सांगण्यात आले. मात्र उर्वरित बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने मयताच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे विनवण्या करून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली. मात्र रुग्णालयाचे बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही, असा पवित्रा या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी धरल्याने मयताचे कुटुंबीय व नातेवाईक चांगलेच हतबल झाले होते. अंत्यसंस्कारासाठी दूरवरुन नातेवाईक हजर झाले मात्र मृतदेह मिळत नसल्याने मयताचे नातेवाईक रुग्णालयासमोरच सकाळपासून बसून होते.

साडेपाच तासानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

थकीत बिलासाठी मृतदेह ताब्यात दिला जात नसल्याची माहिती मिळताच वडगाव-बजाजनगरचे सरपंच सचिन गरड, भगवान ढेरंगे, भाऊसाहेब पवार, उपनिरीक्षक प्रीती फड, पोहेकाँ रामदास गाडेकर आदींनी मयताचे नातेवाईक व डॉक्टरांशी चर्चा केली. दरम्यान, नातेवाईक आक्रमक झाल्याने तसेच रुग्णालयात प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधीही हजर झाल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी नरमाईची भूमिका घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी १५ हजार रुपये रुग्णालयाकडे भरण्याची हमी घेतली. याच बरोबर रुग्णवाहिका व अंत्यसंस्काराचा खर्च करण्याची तयारी दर्शविल्यानंतर सांयकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास मयताचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतदेह ताब्यात देण्याअगोदर थकीत बील न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लेखीपत्र घेण्यासाठी दबाव आणल्याचे मयताचे नातेवाईक सुरेश शिंदे यांनी सांगितले.

चौकट...

नातेवाईकाचा आरोप; डॉक्टरांनी केले हात वर

बिलासाठी मृतदेह रोखून धरल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाल्यानंतर ममता हॉस्पिटलचे डॉ. सुदाम चव्हाण यांनी बिलासाठी मृतदेह रोखून धरला नसल्याची सारवासारव केली. उलट नातेवाईकच मृतदेह ताब्यात घेत नसल्याने रुग्णाचा मृतदेह रुग्णालयात पडून असल्याचे सांगत हात वर करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे रुग्ण दगावल्यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकांना सूचना न देता उलट मेडिकल स्टोअरमधून औषधी मागवून घेतल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

फोटो ओळ- बजाजनगरातील ममता हॉस्पीटलसमोर पोलीस व सामाजिक कार्यकर्ते जमा झाले. कार्यकर्ते व पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेह घेऊन निघालेली रुग्णवाहिका.

---------------------