शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

आदर्श पतसंस्थेच्या ५८.१८ कोटींच्या ४६ मालमत्तांच्या लिलावास गृहमंत्र्यांची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 7:40 PM

१२ जुलै २०२३ रोजी २०२ कोटींच्या आदर्श घोटाळ्याप्रकरणी अंबादास मानकापेसह अन्य संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पैसे परत मिळण्यासाठी ठेवीदारांनी मोठे आंदोलन उभे केले.

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक, व्यवस्थापकांच्या वैयक्तिक नावावर असलेल्या ५६.१८ कोटींच्या ४६ संपत्तींच्या लिलावास गृह विभागाने मंजुरी दिली आहे. आता लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढील प्रक्रिया राबवली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

१२ जुलै २०२३ रोजी २०२ कोटींच्या आदर्श घोटाळ्याप्रकरणी अंबादास मानकापेसह अन्य संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पैसे परत मिळण्यासाठी ठेवीदारांनी मोठे आंदोलन उभे केले. ३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात मानकापेच्या मालमत्तासंदर्भात ठेवीदारांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईला पाठवलेल्या प्रस्तावाच्या प्रक्रियेने वेग घेतला. १४ ऑगस्ट रोजी गृह विभागाकडून याबाबत आदेश जारी झाले.

मानकापे व आदर्शची एकूण मालमत्ता- २०१६ ते २०१९ : १०३ कोटी १६ लाख ७३ हजार ३८१ रुपये- २०१८ ते २०२३ : ९९ कोटी सात लाख ९० हजार ५७९ रुपये

संपत्तीमानकापे कुटुंब - ४६ संपत्तीआदर्श ग्रुप - १९ संपत्तीमानकापे व अन्य संचालक - ३९ संपत्ती

समिती लिलावाचा दर ठरवणारएकूण १०४ संपत्तीमध्ये वाहने, पेट्रोल पंप, शेती, बंगले, फ्लॅट्स, हॉटेल, बार, संस्थेचे कार्यालय, मंगल कार्यालय, रुग्णालय, अपार्टमेंट, गाळ्यांचा समावेश आहे. रेडिरेकनरनुसार ही संपत्ती ९९ ते १०० कोटींची आहे. बाजारभावानुसार (मार्केट व्हॅल्यू) २५० कोटी रुपयांपर्यंत ही रक्कम आहे. लिलावासाठी नियुक्त समिती व उपनिबंधक कार्यालयाची समिती या दोन्ही दरांमधून सुवर्णमध्य साधून एक दर निश्चित करेल.

ठेवीदारांना २२ लाख परत केले१४ ऑगस्टपर्यंत ४४५ ठेवीदारांना २२ लाख २३ हजार ३२० रुपये परत करण्यात आले. सध्या आदर्शकडे ३ कोटी रुपये जमा असून, काही दिवसांत ही रक्कम ४ कोटींपर्यंत जाईल. येत्या दोन दिवसांत ठेवीदारांना पैसे परत करण्याचा दुसरा टप्पा सुरू होईल, असे प्रशासक सुरेश काकडे यांनी स्पष्ट केले.

३९ संपत्तींच्या जप्तीचा दुसरा प्रस्ताव४६ संपत्तींव्यतिरिक्त आर्थिक गुन्हे शाखा आणखी ३९ संपत्तींच्या जप्ती व लिलावाच्या मंजुरीसाठी गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी