परतूर : तालुक्यातील वाढोना येथील ९ ग्रामस्थांची बोगस नावे दाखवून रायगव्हाण येथे घरकुलांचा लाभ देण्याचा प्रताप रायगव्हाण येथील सरंपच व ग्रासेवकाने केला आहे. आता वरिष्ठही या अजब प्रकारावर पांघरून घालण्याचा प्रकार करत आहेत. तालुक्यातील वाढोना येथील ९ ग्रामस्थांची बोगस कागदपत्र तयार करून रमाई अवास योजने अंतर्गत घरकूलाचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये साळवे कचराबाई धोंडीबा, पाटोळे विकास रायभान, पाटोळे धोंडीबा रायभान, पाटोळे जनार्धन लक्ष्मण, पाटोळे लक्ष्मण वामन, साळवे भुजंग गूणाजी, साळवे बाळाभाऊ गोपाळ, पाटूळे बाबूलाल रायभान यांचा समावेश आहे. यातील एक लाभार्थी तर मागील तेरा वर्षापासून पैठण येथे कारागृहात शिक्षा भोगत आहे. या लाभार्थ्यांना सन २०१४-१५ मध्ये शासनाकडून घरकूल मंजूर झाले होते. याचे अनुदानही आले होते. परंतु रागव्हाणचे सरपंच व ग्रामसेवक यांनी बनावट कागदपत्राअधारे बँकेत खाते उघडून घरकुलाची रक्कम परस्पर उचलली. या लाभार्थ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांचीही भेट घेतली मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळाली. लाभार्थी वाढोण्याचे लाभ रायगवहणला असा अजब प्रकार करण्यात आला आहे. आता या लाभार्थ्यांनी संबधीतांची चौकशी होउन कारवाईसाठी १ आॅगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
बोगस कागदपत्रांद्वारे घेतला घरकुलाचा लाभ
By admin | Published: July 22, 2016 12:20 AM