शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

सन्मान मायलेकींचा...गौरव त्यांच्या नात्याचा

By admin | Published: May 22, 2016 12:20 AM

औरंगाबाद : एकमेकींचा भक्कम आधार बनलेल्या माय-लेकींचा सन्मान आज लोकमत सखी मंच प्रस्तुत ‘मेरी माँ’ पॉवर्ड बाय भाग्यविजय या कार्यक्रमात झाला.

औरंगाबाद : एकमेकींचा भक्कम आधार बनलेल्या माय-लेकींचा सन्मान आज लोकमत सखी मंच प्रस्तुत ‘मेरी माँ’ पॉवर्ड बाय भाग्यविजय या कार्यक्रमात झाला. ग्लोबल डिस्कव्हरी स्कूल हे या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सरर होते. अजूनही अनेक ठिकाणी मुलींना ओझे समजले जाते. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या घटना आजही वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर लोकमतने मुलीच्या जन्मानेच आयुष्याचे सार्थक झाले असे मानणाऱ्या अनेक मातांचा त्यांच्या कन्येसोबत सत्कार केला.या कार्यक्रमाला वास्तुविशारद विजय चाटोरीकर, वृषाली चाटोरीकर, ग्लोबल डिस्कव्हरी स्कूलच्या संचालिका स्मिता कंचार, अमोल कंचार, तसेच सुप्रसिद्ध गायक धवल चांदवडकर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पाणीबचतीसाठी ‘लोकमत’ ने सुरू केलेल्या ‘जलमित्र’ अभियानाबद्दलही जागृती करण्यात आली. सर्व सखींनी एकत्र येऊन कमीत कमी पाणी वापरण्याबद्दल शपथ घेतली. विजय चाटोरीकर म्हणाले की, आई आणि मुलीचा एकाच व्यासपीठावर सत्कार करण्याचा लोकमतचा उपक्रम नावीन्यपूर्ण आहे. स्मिता कंचार म्हणाल्या की, आज एकविसाव्या शतकातही स्त्रीभ्रूणहत्या होत असताना, या कार्यक्रमाद्वारे मुलींचा त्यांच्या आईसोबत सन्मान करणे खरोखरच कौतुकास्पद आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये तुलना करणे निरर्थक बनते.माँ.... मेरी माँ...आईची महती सांगणाऱ्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आईचे वर्णन करणारी अनेक नवी-जुनी, हिंदी-मराठी गाणी ऐकताना सखी भावविवश होत होत्या. अरविंद पिंगळे, डॉ. धनश्री सरदेशपांडे यांनीही दर्जेदार गाणी सादर केली. ढोलकीवर जीवन कु लकर्णी, आॅक्टोपॅडवर राहुल जोशी, सिंथेसायझरवर राजेश तायडे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. महेश अचिंलवार यांनी केले.