शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणारा सन्मान सोहळा उद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 7:15 PM

लोकमत वूमन अ‍ॅचिव्हर्स अवॉर्ड : अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा गौरव

ठळक मुद्देनिशिगंधा वाड यांची विशेष उपस्थिती

औरंगाबाद : प्रत्येक नात्याचा पदर हळुवारपणे सांभाळत स्वत:च्या स्वप्नांना मुक्तपणे गवसणी घालण्यासाठी बाहेर पडलेली ‘ती’ आता एक तेजोमयी तारका म्हणून प्रकाशमान झाली आहे. सुरुवातीला थबकत पडणारी तिची पावले आज भक्कमपणे रोवल्या गेली असून अनेकांसाठी ती एक आधारस्तंभ बनली आहे. ‘लोकमत’ने तिचा हा प्रवास जवळून पाहिला, अनुभवला आहे आणि म्हणूनच तिच्या गौरवशाली कर्तृत्वावर समाजमान्यतेची मोहोर उठविण्यासाठी आणि तिचे मनापासून कौतुक करत तिच्या पंखांना बळ देण्यासाठी ‘लोकमत वूमन अ‍ॅचिव्हर्स अवॉर्ड’ या गौरव सोहळ्याचे लोकमत आणि नारायणा आयआयटी, पीएमटी अकॅडमीतर्फे दि. १३ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातच ‘वूमेन अ‍ॅचिव्हर्स अवॉर्ड कॉफीटेबल बुक’चे विमोचन करण्यात येणार आहे.

सामान्य ते असामान्य अशा प्रवासातील कार्यरत स्त्रियांची दखल घेणारा, त्यांना एक स्थान, सन्मान आणि अभिमान याची जाणीव देणारा हा सोहळा आहे. पंखातील बळ, जबर महत्त्वाकांक्षा आणि अविरत कष्टाच्या जोरावर आज महिलांनी यशोशिखर गाठले आहे. खाचखळग्यांनी पुरेपूर भरलेल्या या वाटेवर त्यांनी स्वत:चा मार्ग तयार केला. आज या कर्तृत्ववान महिलांची गगनभरारी अमर्यादित असून, इतरांना अचंबित करणारी आणि त्याच वेळी प्रेरणा देणारीही आहे. तिचा हा यशस्वी प्रवास, तिची यशोगाथा निश्चितच अनेक धडपडणाऱ्या तरुणींना नकळत प्रेरणा देऊन जाते. तिच्याकडे बघून अनेकींना नवी आशा मिळते. त्यामुळेच तर तिचा हा प्रेरणादायी प्रवास अवघ्या जगासमोर आणण्यासाठीचा हा एक कौतुक सोहळा. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच असून, सन्माननीय अतिथींनी दु. ३.३० वा. कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले. 

कार्यक्रमातील सत्कारमूर्तीअलकनंदा मालाणी, अलका कोरडे, अनघा काळे, अनघा तातेड, कल्पना बनसोड, बिंद ओमंगलथू, चैताली गांधी, दीपा पटारे, देवयानी डोणगावकर, डॉ. सुनीता शेळके, डॉ. भावना टाकळकर, गीता आचार्य, हर्षा इंगळे, जयश्री अग्रवाल, जयश्री सोमासे, ज्योती चिलात्रे, कांचन आणि सुलोचना लिंगायत, मानसी वाडकर, नताशा झरीन व गौरी मिराशी, नीलम खेमनार, नीता नालमवार, पद्मा तापडिया, पार्वती फुंदे, प्राजक्ता कुमार, प्रीती भानुशाली, प्रीती सोनवणे, पूजा देशपांडे, रश्मी खिंवसरा, रेखा गोरे, शीतल रुद्रवार, श्रुती काटे, सोनल लदनिया, सुप्रिया बडवे, उज्ज्वला सोनवणे, उषा नागपाल, वर्षा सुर्वे, वर्षा ठाकूर, वृषाली चाटोरीकर. 

निशिगंधा वाड यांची विशेष उपस्थितीमराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेत्री निशिगंधा वाड. बालकलाकार म्हणून निशिगंधा यांनी अभिनयाला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांना अभिनयासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि तेथून पुढे सलग ९ वर्षे त्यांनी ती मिळविली. ‘भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका’ या विषयासाठी मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएच. डी. प्रदान केली आहे. सांस्कृतिक अंगासोबतच निशिगंधा यांचे सामाजिक भानही प्रगल्भ असून महिलांचे अनेक प्रश्नही त्यांनी विविध व्यासपीठांवरून सक्षमपणे मांडले आहेत, असे हे बहुगुणी व्यक्तिमत्त्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून सत्कारमूर्तींना त्यांच्याच हस्ते गौरविण्यात येईल.

टॅग्स :LokmatलोकमतWomenमहिलाAurangabadऔरंगाबाद