शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

बळीराजाच्या आशा पल्लवित

By admin | Published: July 08, 2014 11:14 PM

लातूर : बरेच दिवस ओढ दिल्यानंतर वरुणराजाने मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे़ मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर बळीराजाची धाकधूक वाढली होती़

लातूर : बरेच दिवस ओढ दिल्यानंतर वरुणराजाने मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे़ मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर बळीराजाची धाकधूक वाढली होती़ यंदा खरीपाच्या पेरण्या होतील की नाही, अशीही चिंता व्यक्त करण्यात येत होती़ परंतु, रविवारी पूनर्वसू नक्षत्राचे आगमन होताच टप्प्याटप्प्याने जिल्हाभरात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे़ मंगळवारी पहाटे जवळपास सर्वच तालुक्यात पुनर्वसू बरसले़ त्यामुळे पेरण्यांना आता सुरुवात होण्याची अपेक्षा वाढली आहे़गतवर्षी जेथे जून महिन्यात १३५ मिलीमीटर पाऊस झाला होता़ तिथे यावर्षी केवळ ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे़ त्यातही प्रारंभीच्या टप्प्यात देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने अनेकांनी पेरण्या केल्या होत्या़ मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे़ जुलै महिन्याचा पहिला आठवडाही कोरडाच गेल्यानंतर मंगळवारी पहाटेपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे़ दुपारच्या सुमारासही काही भागात चांगला पाऊस झाला़ पहाटे झालेल्या पावसाची नोंद २४़३९ मिलीमीटर इतकी झाली आहे़ त्यात सर्वाधिक पाऊस उदगीर तालुक्यात ४६़७१ मिमी़ इतका झाला़ त्यापाठोपाठ जळकोट तालुक्यात ४०, शिरुर अनंतपाळ ३५, लातूर व चाकूर २८, देवणी १६, औसा व निलंगा १४, रेणापूर १३ तर सर्वात कमी अहमदपूर तालुक्यात ५ मिमी़ इतका पाऊस झाला आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़सोयाबीन पुन्हा वाढणाऱ़़दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत चालली आहे़ यंदाही अशीच परिस्थिती राहणार आहे़ सोयाबीनखालील सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९२ हजार हेक्टर्स इतके आहे़ त्यात यावेही ८ हजार हेक्टर्सनी वाढ होईल असा कृषी विभागाचा अंदाज होता़ परंतु, पाऊस लांबल्याने मूग, उडीदाची पेरणी आता जवळपास होणार नाही, अशी स्थिती आहे़ त्यामुळे पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊन यावेळी सव्वादोन लाख हेक्टर्सपर्यंत सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे़जूनमध्ये पाऊस होत नसल्याने शेतकरी खत-बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेकडे फिरकला नव्हता़ परंतु, पाऊस होईल या आशेवर गेल्या काही दिवसांपासून त्यांनी खरेदी सुरु केली होती़ आता पेरणीयोग्य पाऊस होत असल्याने आता बाजारपेठेत गर्दी आणखी वाढली आहे़जिल्ह्यात सर्वदूर पाऊस़़़सोमवारी संध्याकाळी लातूर शहरात दिवसभर पावसाची रिपरिप होती़ मंगळवारी सायंकाळी ६ वाजेनंतर तब्बल अर्धा तास मोठा पाऊस झाला़ जिल्ह्यातील चाकूर, अहमदपूर, रेणापूर, औसा, उदगीर व देवणी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे़ मृग आणि आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर बळीराजा धास्तावला होता़ त्यामुळे पेरण्याही रखडल्या होत्या़ मात्र रविवारपासून पावसाला प्रारंभ झाला़ त्यामुळे पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे़ दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अहमदपूर येथे मेघगर्जनेसह पाऊस झाला़ केवळ ८ टक्के पेरण्या़़़पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील पेरण्या यावेळी चांगल्याच खोळंबल्या आहेत़ आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत़ गतवर्षी जवळपास ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या़ यंदा पेरणी झालेल्या ४६१५० हेक्टर्स क्षेत्रापैकी ३१२६६ हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची पेरा झाला आहे़ ८२५६ हेक्टर्सवर तूर, ३०२५ हेक्टर्सवर ज्वारी, १५०४ हेक्टर्सवर मूग, १७२ हेक्टर्स उडीद तर चाऱ्यासाठी ४३९ हेक्टर्स क्षेत्रावर मक्याची लागवड करण्यात आली आहे़