शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

भयंकर! डेक्कन ओडिसीच्या इंजिनवर चढून इलेक्ट्रिक लाईनला पकडले, एकजण गंभीर भाजला

By संतोष हिरेमठ | Updated: January 17, 2025 11:53 IST

ती व्यक्ती रेल्वेच्या इंजिनवर चढेपर्यंत कोणाचेही लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : पर्यटनाची शाही रेल्वे डेक्कन ओडिसीच्या इंजिनवर चढून इलेक्ट्रिक लाईनला पकडल्याने एक जण गंभीर भाजल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगररेल्वेस्टेशनवर घडली. त्याला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा प्रकार लक्षात येताच लोहमार्ग पोलिस संजय राऊत, रामभाऊ मोहेकर, वैभव सपकाळ, सुनील घुगे,  क्षीरसागर, उमेश गायकवाड यांच्यासह रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. इलेक्ट्रिक लाईनला वीजपुरवठा बंद करून जखमी व्यक्तीला इंजिनवरून खाली उतरविण्यात आले. त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ती व्यक्ती रेल्वेच्या इंजिनवर चढेपर्यंत कोणाचेही लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, डेक्कन ओडिसी शाही रेल्वेची आठवी ट्रिप आज ५० पर्यटकांसह छत्रपती संभाजीनगरात दाखल झाली. हे पर्यटक ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि सिंगापूर येथील आहेत. वेरूळ, दौलताबाद दौऱ्यासाठी दुपारी दीड वाजता प्रवासी रवाना होतील.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरrailwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनAccidentअपघात