शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
2
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
3
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
4
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
5
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
6
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
7
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
8
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
9
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
10
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
11
"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
12
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
13
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?
14
IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी
15
खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न
16
मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!
17
Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर
18
राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
19
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."

एएस क्लबजवळ भीषण अपघात, भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत मोपेडस्वार महिला जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 1:19 PM

पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले आहे.

वाळूज महानगर : धुळे-सोलापूर महामार्गावरील एएस क्लब ओहर  ब्रिजवरून कांचनवाडीच्या दिशेने जाणाऱ्या मोपेडला ( क्रमांक एमएच-२३, एव्ही-३३५१) भरधाव वेगातील विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोपेडस्वार महिलेचा ट्रॅक्टरच्या मागील चाकखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. जयश्री भड असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तिसगाव चौक परिसरातील समर्थ रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या जयश्री भड या त्यांचे नातेवाईक सुहास सुपेकर यांच्यासोबत मोपेडवर धुळे-सोलापूर महामार्गाने कांचनवाडीच्या दिशेने निघाल्या होत्या. एएस क्लब येथील ओव्हर ब्रिजवरून खाली उतरत असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात रस्त्यावर पडलेल्या जयश्री यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर ट्रॉलीचे मागील चाक गेले. डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबतचे सुपेकर किरकोळ जखमी झाले. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळतात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, फौजदार मनोज घोडके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDeathमृत्यू