शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शहरातील मोठ्या रस्त्यांचे घोडे अडले

By admin | Published: June 28, 2017 12:50 AM

औरंगाबाद : सोमवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांची एक बैठक नागपुरात पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्लीतील मुख्यालयात महाराष्ट्रातील बहुतांश प्रकल्पांना ब्रेक लागल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांची एक बैठक नागपुरात पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घाईघाईमध्ये प्रकल्पांचे सादरीकरण करून आढावा घेण्यात आल्यामुळे जालना रोड आणि बीड बायपासच्या निविदांबाबत चर्चा होऊ शकली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील अकोला, नागपूर, खामगाव, सोलापूर, औरंगाबादमधील काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर निर्णय होत नसल्याने ती कामे रेंगाळली आहेत. औरंगाबादमधील जालना रोड आणि बीड बायपास रुंदीकरणाच्या सुमारे ८०० कोटी रुपयांच्या कामांचा डीपीआर देऊन वर्षे होत आले आहेत. बैठकीत राज्यातील सर्व प्रकल्पांचा धावता आढावा घेण्यात आला. एनएचएआयचे केंद्रीय संचालक मलिक यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी दीपककुमार यांची वर्णी लागली आहे. त्यांनी मंगळवारी सर्व प्रादेशिकप्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून बैठक घेतली.प्रकल्पांना गती द्या राज्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यासह एनएचएआयचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर आदींची उपस्थिती होती. विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी सांगितले, पूर्ण राज्यातील प्रादेशिक विभागातील प्रकल्पांसाठी ती बैठक होती. सर्व कामांची देखभाल करून निर्धारित काळात ती कामे पूर्ण करण्यासाठी लक्ष दिले जावे, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. सध्या सर्व प्रकल्पांची काय स्थिती आहे, याची माहिती एनएचएआयच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.