आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आता जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. या रूग्णालयाचा परिसरातील जनतेला फायदा होणार आहे.खा. राजीव सातव यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तुकाराम कासार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री रजनीताई सातव, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे, संजय बोंढारे, डॉ. संतोष टारफे, जकी कुरेशी, दिलीप देसाई, जि.प. सदस्य अॅड. बाबा नाईक, सरपंच मारोती खरवडे, नंदकिशोर तोष्णीवाल, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी. देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हेमंतकुमार बोरसे, तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, कोटलवाड, शाखा अभियंता क्षीरसागर, बी.जी. पाटील, कंत्राटदार, सुजित विडोळकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी राजीव सातव यांनी भविष्यात या ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना अतिशय चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. (वार्ताहर)
बाळापूरचे रुग्णालय जनतेसाठी खुले
By admin | Published: August 17, 2014 12:26 AM